
वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तान चॅम्पियन्सने वेस्ट इंडिज चॅम्पियन्सला विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. पाकिस्तानसाठी कॅप्टन यूनिस खान याने सर्वाधिक धावा केल्या. तर कामरान अकमल याने शानदार खेळी केली. तर आमिर यामीन आणि सोहेल तन्वीर या दोघांनी अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत टीमला 190 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. आता विंडिजचे फलंदाज या विजयी धावांचा यशस्वी पाठलाग करुन फायनलमध्ये धडक मारणार की पाकिस्तान रोखणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तानला विंडिजने झटपट 3 झटके दिले. शर्जिल खान, मकसूद खान आणि शोएब खान हे तिघे आऊट झाल्याने 3 बाद 10 असा स्कोअर झाला. त्यानंतर कामरान अकमल आणि कॅप्टन यूनिस खान या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 57 बॉलमध्ये 79 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर कामरान 31 बॉलमध्ये 46 रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर विंडिजने पाकिस्तानला 13 व्या ओव्हरमध्ये सलग 2 झटके दिले. शाहिद अफ्रिदी 1 रन करुन आऊट झाला. तर मिस्बाह उल हक याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर कॅप्टन यूनिसने आमिर यामिनसह 19 बॉलमध्ये 34 रन्स जोडल्या. त्यानंतर यूनिस आऊट झाला. यूनिस 45 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह 65 रन्स केल्या. पाकिस्तानने अशाप्रकारे सातवी विकेट गमावली.
त्यानंतर आमिर यामीन आणि सोहेल तन्वीर या दोघांनी दे दणादण बॅटिंग केली. दोघांनी फक्त 25 बॉलमध्ये 61 धावांची भागीदारी केली. तन्वीर 17 बॉलमध्ये 33 धावांची खेळी केली. तर आमिर यामिन 18 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्स केल्या. विंडिजकडून फिडल एडवर्ड्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. एस बेन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. जर्मन टेलर आणि ड्वेन स्मिथ यांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
वेस्ट इंडिज चॅम्पियन्स प्लेइंग इलेव्हन: डॅरेन सॅमी (कॅप्टन), ड्वेन स्मिथ, चॅडविक वॉल्टन (विकेटकीपर), जोनाथन कार्टर, जेसन मोहम्मद, ॲशले नर्स, रायड एम्रिट, जेरोम टेलर, फिडेल एडवर्ड्स, टिनो बेस्ट आणि सुलेमान बेन.
पाकिस्तान चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युनूस खान (कॅप्टन), कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिसबाह-उल-हक, आमेर यामीन, सोहेल खान, वहाब रियाझ आणि सोहेल तन्वीर.