#Virat Kohli| ‘चॅम्पियन तुझा आम्हाला अभिमान आहे’ विराटचा भाऊ विकास कोहलीने लिहिली भावनिक पोस्ट

भाऊ मला तुझा खरोखर अभिमान वाटतो. कारण मला माहित आहे की मैदानावर असण्यापासून आणि तसे करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत. तु बरेच काही आत्मसात केले. तू कायमच  तुझ्या संघावर आणि तुझ्या स्वप्नावर विश्वास ठेवला आहे. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत.

#Virat Kohli| चॅम्पियन तुझा आम्हाला अभिमान आहे विराटचा भाऊ विकास कोहलीने लिहिली भावनिक पोस्ट
विराट कोहली
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 11:50 AM

मागील सात वर्षे भारतीय कसोटी संघाला मेहनत, अथक परिश्रम व चिकाटीच्या बळावर प्रगतीच्या दिशेने घेऊन गेल्यानंतर आता थांबण्याची वेळ आली आहे. असं म्हणत शनिवारी विराट कोहलीनं भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून कोहलीने ही बातमी दिली आहे. कसोटी कर्णधारपदाची 2014 मध्ये धुरा हाती घेतल्यानंतर 68 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले त्यातील 40 सामने त्याने जिंकले आहेत. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर त्याचा मोठा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिली पोस्ट
विकास कोहलीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. यामध्ये विकासने टेस्ट जर्सीमधील विराटचा फोटो शेअर करता लिहिले आहे की ‘तू आता आणि कायमच चॅम्पियन आहेस.’ ‘ तुझा (आपल्या कुटुंबाला ) आणि संपूर्ण देशाला अभिमान आहे. भाऊ मला तुझा खरोखर अभिमान वाटतो. कारण मला माहित आहे की मैदानावर असण्यापासून आणि तसे करण्याचा निर्णय घेण्यापर्यंत. तु बरेच काही आत्मसात केले. तू कायमच  तुझ्या संघावर आणि तुझ्या स्वप्नावर विश्वास ठेवला आहे. आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत. चॅम्पियन तुझा आम्हाला अभिमान आहे.

 रोहित होणार कर्णधार?
रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाचा उपकर्णधार होता व तो कर्णधार बनणार आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका ही कर्णधार म्हणून त्याची पहिली जबाबदारी असेल. वर्क लोड मॅनेजमेंट अंतर्गत, रोहित जेव्हा जेव्हा ब्रेक घेतो तेव्हा के एल राहुलकडे कमांड दिली जाऊ शकते.

Virat Kohli | कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला, तेव्हा विराटने झळकावले होते द्विशतक

#Virat Kohli : विराट कोहलीनं टीम इंडियाला मध्येच सोडलं, नव्या कर्णधाराच्या शोधात बीसीसीआय!

Virat Kohli Captaincy: कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत गांगुलीने मौन सोडलं, म्हणाला…