#Virat Kohli : विराट कोहलीनं टीम इंडियाला मध्येच सोडलं, नव्या कर्णधाराच्या शोधात बीसीसीआय!

#Virat Kohli : विराट कोहलीनं टीम इंडियाला मध्येच सोडलं, नव्या कर्णधाराच्या शोधात बीसीसीआय!
विराट कोहली

दक्षिण आफ्रिके(South Africa)विरुद्धची कसोटी मालिका 1-2नं गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (Team India) मिशन एकदिवसीय सामन्यासाठी तयारी करत होता. मालिका संपल्यानंतर 24 तासांनंतर विराट कोहली(Virat Kohli)नंही कसोटी(Test)चं कर्णधारपद सोडलं.

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 11:29 AM

दक्षिण आफ्रिके(South Africa)विरुद्धची कसोटी मालिका 1-2नं गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (Team India) मिशन एकदिवसीय सामन्यासाठी तयारी करत होता. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची अधिक चांगली संधी होती, मात्र चाहत्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. पण यानंतर जे घडलं ते अधिक धक्कादायक आणि चिंताजनक होतं. मालिका संपल्यानंतर 24 तासांनंतर विराट कोहली(Virat Kohli)नंही कसोटी(Test)चं कर्णधारपद सोडलं.

ट्विटद्वारे चाहत्यांना दिली माहिती

भारतीय कसोटी इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीनं एका ट्विटद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वादाच्या भोवऱ्यात

विराट कोहलीसोबत गेल्या चार-पाच महिन्यांत जे कठीण प्रसंग आले, त्यानुसार हे आश्‍चर्यकारक वाटत नसलं तरी सध्याची परिस्थिती त्याचा हा निर्णय स्वीकारायला योग्य अशी नाही. सध्या दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरू आहे, तसेच भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या मध्यावर आहे आणि गेल्या दोन-तीन महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल झाले आहेत, त्यामुळे विराट कोहलीचा हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

संघाच्या मनोबलावर परिणाम

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक होण्यापूर्वी विराट कोहलीनं अशाच प्रकारे टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं होतं. तेव्हापासून भारतीय क्रिकेटमध्ये थोडी अशांतता आहे. जेव्हा कर्णधार विश्वचषकापूर्वी अशी घोषणा करतो, तेव्हा त्याचा संघाच्या मनोबलावर परिणाम होतो. आता कसोटी फॉरमॅटमध्येही असंच झालं आहे, जेव्हा विराट कोहलीनं मालिका गमावल्यानंतर लगेचच असा निर्णय घेतला.

‘माझ्यासाठी हा वाईट दिवस, पण…’विराटच्या राजीनाम्यानंतर रवी शास्त्रींचं भावनिक टि्वट

#Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन

#ViratKohli: Wisden इंडियाने खास टि्वट करुन विराटच्या कॅप्टनशिपला केला सलाम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें