Icc : इंग्लंडला पहिल्या सामन्यानंतर आयसीसीकडून मोठा झटका, टीम इंडिया विरुद्धची एक चूक महागात

Women England vs Womens India 1st T20i : यजमान वूमन्स इंग्लंडने पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर गुडघे टेकले. इंग्लंडचे फलंदाज आणि गोलंदाज ढेर झाले. इंग्लंडला या पराभवानंतर आणखी एक झटका लागला आहे.

Icc : इंग्लंडला पहिल्या सामन्यानंतर आयसीसीकडून मोठा झटका, टीम इंडिया विरुद्धची एक चूक महागात
Icc
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 29, 2025 | 6:40 PM

इंग्लंड वूमन्स क्रिकेट टीमला मायदेशात टीम इंडिया विरुद्ध टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाहुण्या टीम इंडियाने इंग्लंडवर नॉटिंघममध्ये झालेल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. वूमन्स टीम इंडियाने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात इंग्लंडचा 97 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडचा हा टी 20i क्रिकेट इतिहासातील धावांबाबत सर्वात मोठा पराभव ठरला. भारताने इंग्लंडसमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 14.5 ओव्हरमध्ये इंग्लंडला 113 रन्सवर गुंडाळलं आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडला या पराभवानंतर मोठा झटका लागला आहे. आयसीसीने इंग्लंडवर मोठी कारवाई केली आहे.

आयसीसीने इंग्लंडवर दंडात्मक कारवाई केली आहे. आयसीसीने इंग्लंडच्या प्लेईंग ईलेव्हनमधील सर्व खेळाडूंवर कारवाईचा बडगा उचलला आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

कारवाई कशामुळे?

इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीने या सामन्यात टॉस जिंकून बॉलिगंचा निर्णय घेतला. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 210 धावांचा डोंगर उभा केला. भारतासाठी कर्णधार स्मृती मंधाना हीने शतकी खेळी केली. स्मृतीने 112 धावा केल्या. स्मृतीचं टी 20i क्रिकेटमधील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. मात्र इंग्लंड या सामन्यात निर्धारित वेळेत 20 ओव्हर पूर्ण करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे आयसीसीने इंग्लंड वूमन्सवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाईचा चाबूक चालवला आहे. नियमांनुसार, निश्चित वेळेत 20 ओव्हरचा खेळ पूर्ण व्हायला हवा. मात्र इंग्लंड टीम तसं करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे इंग्लंडला या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

इंग्लंडला पहिल्या पराभवानंतर झटका

टीम इंडिया विरूद्धच्या एका चुकीमुळे इंग्लंडच्या 11 खेळाडूंना एका सामन्याच्या मानधनापैकी 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. इंग्लंड टीमकडून निर्धारित वेळेत 2 ओव्हर कमी टाकल्या गेल्या. त्यामुळे इंग्लंडवर ही कारवाई करण्यात आली. इंग्लंड कर्णधार नेट सायव्हर ब्रँट हीने चूक मान्य केली. इंग्लंड टीमवर आयसीसी आचार संहिता 2.22 नुसार ही कारवाई करण्यात आली. आयसीसी आचार संहितेच्या 2.22 मध्ये स्लो ओव्हर रेटसाठी संबंधित संघावर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित संघावर 1 ओव्हर टाकण्यास विलंब झाल्यास सामन्याच्या एकूण मानधनापैकी 5 टक्के रक्कम दंडाची तरतूद आहे.