ENG vs IND : हरमनप्रीत कौरचा शतकी तडाखा, इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हान, कोण जिंकणार मालिका?

England Women vs India Women : भारतीय महिला संघाने इंग्लंड क्रिकेट टीमसमोर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 319 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.

ENG vs IND : हरमनप्रीत कौरचा शतकी तडाखा, इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हान, कोण जिंकणार मालिका?
Harmanpreet Kaur IND vs ENG
Image Credit source: @BCCIWomen X Account
| Updated on: Jul 22, 2025 | 9:57 PM

कर्णधार हरमनप्रीत कौर हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 318 धावा केल्या. भारतासाठी हरमनप्रीत व्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्स हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही काही धावांची भर घातली. त्यामुळे भारताला 300 पार सहज मजल मारता आली. फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. त्यानंतर आता भारताला सामन्यासह मालिका जिंकायची असेल तर गोलंदाजांवर मदार असणार आहे. त्यामुळे कोणता संघ अंतिम सामना जिंकून मालिकेवर नाव कोरतो, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

भारतीय संघाची फलंदाजी

भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना सलामी जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघींनी 64 धावांची भागीदारी केली.त्यानंतर प्रतिका 26 धावांवर बाद झाली. त्यानंतर भारताने स्मृतीच्या रुपात 81 धावांवर दुसरी विकेट गमावली. स्मृतीने 45 धावा केल्या.

त्यानतंर हर्लीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौर जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 81 रन्सची पार्टनरशीप केली.हर्लीन देओलही स्मृतीप्रमाणे 45 धावा करुन माघारी परतली. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी हरमनप्रीत आणि जेमिमाह रॉड्रिग्स या जोडीने शतकी भागीदारी केली. दोघींनी चौथ्या विकेटसाठी 110 धावा जोडल्या. जेमिमाह अर्धशतक करुन माघारी परतली.

जेमिमाहने 45 बॉलमध्ये 7 फोरसह 50 रन्स केल्या. जेमीमाह बाद झाल्यानतंर हरमनप्रीतने शतक पूर्ण केलं. मात्र त्यानतंर हरमनप्रीत आऊट झाली. हरमनप्रीतने 84 चेंडूत 14 चौकारांसह 102 धावा केल्या. तर रिचा घोष आणि राधा यादव ही जोडी नाबाद परतली. रिचा घोष हीने वादळी खेळी केली. रिचाने 18 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा केल्या. तर राधाने 2 धावा केल्या. तर इंग्लंडच्या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

इंग्लंडसमोर 319 धावांचं आव्हान

मालिका कोण उंचावणार?

दरम्यान टीम इंडियाने इंग्लंडवर टी 20i मालिकेत 3-2 अशा फरकाने विजय मिळवला आहे. त्यानंतर आता 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. आता तिसरा सामना जिंकून कोणता संघ मालिका आपल्या नावावर करतो? याची उत्सुकता चाहत्यांना आहे.