ENG vs IND: 2 मालिका आणि 8 सामने, टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

England vs India Womens T20i And Odi Series Schedule: इंग्लंड दौऱ्यात वूमन्स टीम इंडिया टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

ENG vs IND: 2 मालिका आणि 8 सामने, टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
india tour england 2025 schedule
| Updated on: Aug 22, 2024 | 5:05 PM

टीम इंडिया काही दिवसांनी सप्टेंबर महिन्यात मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीचा भाग असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. अशात इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 2025 सालच्या मायदेशातील विविध मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार मेन्स आणि वूमन्स टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयनेही टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील सामन्यांचं वेळापत्रक सोशल मीडियावरुन शेअर केलं आहे.

मेन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध जून ते जुलै 2025 दरम्यान एकमेव कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. तर वूमन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. टी 20i मालिकेत एकूण 5 सामने होणार आहेत. तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. मेन्स टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवात ही 20 जून पासून होणार आहे. तर 4 ऑगस्टला दौऱ्याची सांगता होईल. तर वूमन्स टीम इंडियाच्या टी 20i मालिकेचं आयोजन हे 28 जून ते 12 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. तर 16 ते 22 जुलै दरम्यान एकदिवसीय मालिका पार पडणार आह.

वूमन्स टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

टी 20i मालिका

पहिला सामना, 28 जून, ट्रेन्ट ब्रिज

दुसरा सामना, 1 जुलै,

तिसरा सामना, 4 जुलै, लंडन

चौथा सामना, 9 जुलै, मॅनचेस्टर

पाचवा सामना,12 जुलै, बर्मिंगघम

इंग्लंडकडून 2025 सालच्या मायदेशातील मालिकांचं वेळापत्रक जाहीर

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 16 जुलै, साउथम्पटन

दुसरा सामना, 19 जुलै, लॉर्ड्स

तिसरा सामना, 22 जुलै

दरम्यान वूमन्स टीम इंडियाला नुकत्याच झालेल्या वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं. वूमन्स श्रीलंकेने मायदेशात टीम इंडियाचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच आशिया कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरत इतिहास रचला.