Good News: IND vs WI – इडन गार्डन्स स्टेडियमवर प्रेक्षक उपस्थिती संदर्भात ममता बॅनर्जी सरकारने घेतला मोठा निर्णय

| Updated on: Feb 01, 2022 | 8:21 AM

स्टेडियमवर प्रेक्षक उपस्थिती संदर्भात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने (Mamata Banerjee govt) अत्यंत महत्त्वपूर्ण धाडसी निर्णय घेतला आहे.

Good News: IND vs WI - इडन गार्डन्स स्टेडियमवर प्रेक्षक उपस्थिती संदर्भात ममता बॅनर्जी सरकारने घेतला मोठा निर्णय
eden gardens
Follow us on

कोलकाता: स्टेडियमवर प्रेक्षक उपस्थिती संदर्भात पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने (Mamata Banerjee govt) अत्यंत महत्त्वपूर्ण धाडसी निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) आगामी टी-20 सीरीजच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 16 फेब्रुवारीपासून इडन गार्डन्स (Eden gardens) स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मागच्या दोन वर्षांपासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना क्रिकेट सामने सुरु होते. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्यावर बंदी घातली होती. पण आता लसीकरणानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पश्चिम बंगाल सरकारने स्टेडियममध्ये सामने पाहण्यासासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. ममता बॅनर्जी सरकारने वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी इडन गार्डन्स स्टेडियमवर 75 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने सोमवारी अधिसूचना जारी केली. त्यानुसार, सर्व इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा स्पर्धा, कार्यक्रमांना 75 टक्के प्रेक्षकवर्गाला उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सामन्यांच्यावेळी इडन गार्डन्सवर 50 हजार प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ येत्या 6 फेब्रुवारीपासून वनडे मालिका खेळणार आहे. हे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. त्यानंतर टी-20 सामने कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियममध्ये होतील. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

“क्रीडा कार्यक्रम आणि 75 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी दिल्याबद्दल आम्ही आदरणीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्य सचिव आणि पश्चिम बंगाल सरकारचे आभार मानतो” असे कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामना इडन गार्डन्सवर झाला होता. त्यावेळी 70 टक्के प्रेक्षक उपस्थितीला परवानगी दिली होती. वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याच जे मूळवेळापत्रक होतं, त्यानुसार अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता येथे तीन वनडे सामने होणार होते, तर कटक, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपूरम येथे तीन टी-20 सामने होणार होते. पण देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अहमदाबाद आणि कोलकाता या दोन ठिकाणीच वनडे आणि टी-20 मालिका आयोजित करण्याचा निर्णय झाला.

West Bengal govt gives nod to 75% attendance for Eden T20 Ind vs West Indies series