वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी केली संघाची घोषणा, या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली संधी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यासाठी संघांची घोषणा केली जात आहे. अजूनही काही संघांनी 15 खेळाडूंची नावं जाहीर केलेली नाहीत. यात वेस्ट इंडिजही आहे. पण त्यांनी या स्पर्धेपूर्वीच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.

वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी केली संघाची घोषणा, या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली संधी
वेस्ट इंडिजने टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी केली संघाची घोषणा, या खेळाडूला पहिल्यांदाच मिळाली संधी
Image Credit source: west indies cricket twitter
| Updated on: Jan 13, 2026 | 9:44 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी एकूण 20 संघात लढती होणार आहेत. असं असताना संघांच्या घोषणा केल्या जात आहेत. या स्पर्धेत क गटात असलेल्या पाच पैकी तीन संघांनी घोषणा केली आहे. यात इंग्लंड, बांग्लादेश आणि नेपाळचा समावेश आहे. पण वेस्ट इंडिज आणि इटलीच्या संघाची घोषणा काही झालेली नाही. असं असताना या स्पर्धेपूर्वी वेस्ट इंडिजने आपले फासे टाकले आहेत. वेस्ट इंडिजचा संघ दुबईमध्ये अफगाणिस्तानशी तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही टी20 मालिका 19 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान होणार आहे. यासाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला आहे. वेस्ट इंडिजने या संघात 16 खेळाडूंचा समावेश केला आहे. यात वेगवान गोलंदाज शामर जोसेफ आणि एविन लुईस यांचं नाव आहे. वेगवान गोलंदाज शामर जोसेफ गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. त्याचं आता कमबॅक झालं आहे.

दुसरीकडे, संघाची धुरा शाई होप ऐवजी ब्रँडन किंगकडे सोपवली आहे. कारण शाई होप एसए20 संघात सहभागी आहे. त्यामुळे त्याला टी20 संघाचं नेतृत्व करता येणार नाही. रोस्टन चेस, अकील होसेन आणि शेरफेन रूदरफोर्ड हे देखील एसए20 मुळे या मालिकेला मुकणार आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धची मालिका टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीचा एक भाग आहे. ही मालिका संपल्यानंतर 27 ते 31 जानेवारी दरम्यान दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे.

वेस्ट इंडिज संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सांगितलं की, ‘आम्हाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेची तयारी करण्यासाठी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत होईल 2025 च्या अखेरीस बराच काळ खेळू न शकलेल्या खेळाडूंची अंतिम संघ निवडीपूर्वी या मालिकेत महत्त्वाची भूमिक बजावणाऱ्या खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे.’

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ: ब्रँडन किंग (कर्णधार), एलिक अथानासे, केसी कार्टी, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्डे, जस्टिन ग्रीव्हज, शिमरॉन हेटमायर, अमीर जांगू, शमार जोसेफ, एविन लुईस, गुडाकेश मोती, खारी पियरे, क्वेंटिन सॅम्पसन, जेडेन सील्स, रेमन सिमंड्स, शमार स्प्रिंगर.