टीम इंडियात या खेळाडूला वारंवार संधी देण्याचं कारण काय? खरं काय ते समजलं तर ट्रोलिंग करणं सोडाल

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी दोन्ही संघात शुबमन गिलसह सात खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली आहे. आता एका खेळाडूच्या नियुक्तीवरून वादाला फोडणी मिळाली आहे. चला जाणून घेऊयात काय ते..

टीम इंडियात या खेळाडूला वारंवार संधी देण्याचं कारण काय? खरं काय ते समजलं तर ट्रोलिंग करणं सोडाल
टीम इंडियात या खेळाडूला वारंवार संधी देण्याचं कारण काय? खरं काय ते समजलं तर ट्रोलिंग करणं सोडाल
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 06, 2025 | 10:46 PM

वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना पार पडला की भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारत या दौऱ्यात तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी20 संघांची घोषणा केली. वनडे मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिलकडे वनडे संघाचं नेतृत्व असणार आहे. दोन्ही संघात शुबमन गिलसह सात खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली आहे. पण दोन्ही संघात निवडलेल्या एका खेळाडूची जोरदार चर्चा रंगली आहे. उर्वरित सहा खेळाडूंबाबत काहीच प्रश्न उपस्थित केले जात नाही. पण एकच खेळाडू ट्रोलर्सच्या रडारवर आला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज हार्षित राणा आहे. त्याच्या निवडीनंतर ट्रोलर्स सक्रीय झाले आहेत. ट्रोलर्संना त्याच्या निवडीवर आक्षेप आहे. दिल्लीच्या 23 वर्षीय वेगवान गोलंदाजावर टीका केली जात आहे.

हार्षित राणासोबत संघातील वरिष्ठ खेळाडूंनी फार काही क्रिकेट खेळलेलं नाही. पण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत त्याने केकेआरमध्ये एक पर्व काढलं आहे. या वर्षी केकेआरने आयपीएल 2024 चा किताब जिंकला होता. यात हार्षित राणाची भूमिका खास राहिली होती. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होताच त्याची संघात नियुक्ती झाली. 2024 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटीत पदार्पण केलं. जानेवारी 2025 मध्ये टी20 संघात स्थान मिळवलं. त्यानंतर एका आठवड्याने वनडे संघात खेळण्याची संधी मिळाली. त्याची कामगिरी ठीकठाक राहिली. चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला मोहम्मद सिराजच्या जागी निवडलं. पण त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. दोन कसोटीत फक्त चार विकेट घेतल्या. तीन टी20 सामन्यात 10 इकोनॉमीने फक्त 5 विकेट घेतल्या. आतापर्यंत खेळलेल्या पाच वनडे सामन्यात त्याने एकूण 10 विकेट घेतल्यात.

हार्षितची निवड होण्याचं कारण काय?

हार्षित राणाची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झालेल्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हार्षित गोलंदाजीसोबत फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्यामुळे स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यांची उंची ही जमेची बाजू आहे. त्यामुळे वेगाने गोलंदाजी करण्यासोबत बाउंस करू शकतो. त्याला दोन वर्षांनी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने तयार केलं जात आहे. वनडे वर्ल्डकप दक्षिण अफ्रिकेत होणार आहे आणि त्या खेळपट्ट्यांवर उंच वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतात. दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये उंच गोलंदाज आहेत. पण भारताकडे तसं नाही. त्यामुळे अशा गोलंदाजांची आवश्यक आहे. हार्षितच नाही तर प्रसिद्ध कृष्णाकडेही त्याच दृष्टीने पाहीलं जातं आहे.