पाकिस्तानच्या अबरार अहमदला काव्या मारनच्या फ्रेंचायझीने खरेदी करण्याचं कारण काय? जाणून घ्या

द हंड्रेड लीग स्पर्धेत काव्या मारनच्या फ्रेंचायझीने पाकिस्तानच्या मिस्ट्री गोलंदाज अबरार अहमदला खरेदी केल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सनरायझर्स फ्रेंचायझीवर टीकेची झोड उठली आहे. पण अबरार अहमदला विकत घेण्याची वेळ का आली? जाणून घ्या.

पाकिस्तानच्या अबरार अहमदला काव्या मारनच्या फ्रेंचायझीने खरेदी करण्याचं कारण काय? जाणून घ्या
पाकिस्तानच्या अबरार अहमदला काव्या मारनच्या फ्रेंचायझीने खरेदी करण्याचं कारण काय? जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 13, 2026 | 3:49 PM

The Hundred Kavya Maran Abrar Ahmed: द हंड्रेड 2026 स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या लिलावात भारतीय फ्रेंचायझी पाकिस्तानी खेळाडूंना डावलतील ही चर्चा रंगली होती. पण काव्या मारनची मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्सने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदवर डाव लावला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. लिलावात इतके सारे खेळाडू असताना पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावण्याची गरज काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. आता त्याचं कारण पुढे आलं आहे. सनरायझर्स लीड्सचा प्रशिक्षक डॅनियल विटोरी या मागचं कारण सांगितलं. सनरायझर्स लीड्सचा प्रशिक्षक डॅनियल विटोरीने सांगितलं की, आमचा संघ हा इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीद विकत घेण्यासाठी आग्रही होती. पण सदर्न ब्रेव्सने त्याला विकत घेतलं. त्यामुळे रणनिती बदलून अबरारला विकेट घ्यावं लागलं.

काय म्हणाला डॅनियल विटोरी?

डॅनियल विटोरी म्हणाला की, ‘सुरूवातीला आमची प्राथमिकता ही आदिल रशीद होता. पण संधी हुकल्याने आम्ही विदेशी फिरकीपटूवर लक्ष्य केंद्रीत केलं. आम्ही चार पाच खेळाडूंचा विचार केला होता. त्यापैकी अबरार एक होता. त्याला संघात घेतल्याने आम्ही खूश आहोत.’ दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंबाबत डॅनियल विटोरीने एक खुलासा केला. विटोरीने स्पष्ट केलं की, ‘आम्ही लिलावात सहभागी सर्व खेळाडूंसाठी योजना आखली होती. पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायचं नाही असं काहीच चर्चा झाली नाही. आम्ही फक्त कोणता पर्याय चांगला ठरेल यावर चर्चा केली.’

‘अबरार हा मिस्ट्री गोलंदाज आहे. इंग्लंडच्या अनेक खेळाडूंनी अशा फिरकीचा सामना केलेला नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूकडूंन मिळालेल्या रिव्ह्यूत त्याचा सामना करणं कठीण असल्याचं सांगितलं. त्याच्याकडे गोलंदाजी करताना चांगले पर्याय आहे. पॉवर प्ले आणि मधल्या षटकात चांगली गोलंदाजी करू शकतो.’, असं डॅनियल विटोरी पुढे म्हणाला. अबरार अहमदसाठी सनरायझर्स लीड्सने 2.3 कोटींची बोली लावली आणि संघात घेतलं. खरं तर 2009 पासून पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला भारतीय फ्रेंचायझीने विकत घेतलं नाही. पण काव्या मारनच्या फ्रेंचायझीने 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या खेळाडूला विकत घेऊन रोष ओढवून घेतला आहे.

Follow Us