
भारतात क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. हा खेळ पाहण्यासाठी चाहते काहीही करण्यास तयार असतात. पण प्रत्येक सामना मैदानात जाऊन पाहणं काही शक्य होत नाही. त्यामुळे टीव्ही, मोबाईल, रेडिओ आणि इतर प्लॅटफॉर्मवर अपडेट मिळत असतात. पण बहुतांश घरात टीव्हीवर आणि प्रवासात मोबाईल एपवर सामने पाहीले जातात. सामना पाहत असताना प्रत्येक अपडेट त्या स्क्रिनवर अपडेट होत असते. खेळाडूने धाव घेतली, विकेट पडली, किती चेंडू टाकले याचे प्रत्येक अपडेत त्या त्या वेळीच मिळत असतात. एका क्षणाचाही विलंब होत नाही. इकडे धाव घेतली की तिथे अपडेट पाहायला मिळते. त्यामुळे इतक्या झटपट अपडेट कोण करतं? त्याची प्रक्रिया काय आहे? चला तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घेऊयात..
क्रिकेट स्पर्धांमध्ये धावा अपडेट करण्याची एक पद्धत ठरलेली आहे. मग आयपीएल असो की आंतरराष्ट्रीय सामने प्रत्येक ठिकाणी धावा आणि इतर गोष्टी अपडेट करण्याची सारखीच पद्धत आहे. सामन्यातील प्रत्येक धाव ही मॅन्युअली अपडेट करावी लागते. ही जबाबदारी ज्या व्यक्तींवर असते त्यांना स्कोरर असं संबोधलं जातं. त्याच्या एक सिस्टम असते आणि ती सिस्टम ब्रॉडकास्टिंगला कनेक्ट असते. त्यामुळे प्रत्येक अपडेट लाईव्ह होत असते. इथे क्लिक केलं की तिथे अपडेट होतं. मग गोलंदाज कोण होता? वाइड नो बॉल सर्व अपडेट केले जातात. स्ट्राईकला कोण होतं. त्या चेंडूवर त्याने किती धावा काढल्या. कुठे शॉट मारला आणि धावा काढल्या याचे बारीकसारीक अपडेट केले जातात. प्रत्येक अपडेट नंतर रेकॉर्ड हा ऑटोमॅटिक अपडेट होत असतो. तसं कोडिंगच असल्याने ते अपडेट होत जातं.
स्कोररचा पगार हा त्याच्या अनुभवावर अवलंबून असतो. ग्राफिक्स टीममधील सर्वात ज्युनिअर व्यक्तीला स्कोरर संबोधलं जातं. त्याचा पगार इतरांच्या तुलनेत कमी असतो. स्कोररचा पगार 25 ते 30 हजारापासून सुरू होतो. जसा अनुभव वाढतो तशी पगारात वाढ होते. पण हे काम करताना खूप लक्ष ठेवावं लागतं. कारण एक चूक झाली तर चुकीचा मेसेज पोहोचू शकतो. त्यामुळे डोळ्यात तेल घालून बघावं लागतं. कोणत्या बाजूला मारला आणि त्या बाजूला काय म्हणतात हे सर्व लक्षात ठेवावं लागतं. त्यामुळे जितका अनुभवा तितका पगार वाढत जातो.