
दुसर्या वनडे सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 350 पार धावा केल्या आहे. तर विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं. त्याला ऋतुराज गायकवाडची साथ मिळाली आणि त्यानेही शतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने 105 आणि विराट कोहलीने 102 धावा केल्या. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली. पण या भागीदारी दरम्यान एक क्षण असा आला की विराट कोहलीच्या काळजाचा ठोका चुकला. विराट आणि ऋतुराज ही जोडी मैदानात जमली होती. दोघंही जुना चेंडू होण्याआधीच संघासाठी झटपट धावा करत होते. कारण एकदा चेंडू जुना झाला की रिव्हर्स स्विंग होईल आणि फलंदाजीला कठीण जाईल. अशा स्थितीत विराट कोहली ऋतुराजसोबत धावा करण्यासाठी धडपड करत होता. यावेळी एक क्षण असा आला की मोठी दुर्घटना होता होता टळली.
विराट कोहलीने फटकेबाजी करताना एक शॉट असा मारला की त्या ऋतुराज गंभीर थोडक्यात वाचला. त्याने इतक्या जोरात फटका मारला होता की हा चेंडू ऋतुराजला लागला असता तर त्याला तंबूतच परतावं लागलं असतं. फटका मारल्यानंतर विराटला चेंडू त्याच्या जवळून जाईपर्यंत हीच भीती वाटत असावी. 34व्या षटकात विराट कोहलीने पुढे समोर जोरात फटका मारला. हा चेंडू काही क्षणात ऋतुराजच्या अगदी जवळून गेला. ऋतुराजने कसं बसं स्वत:ला वाचवलं. खाली पडला आणि चेंडू बाजूने निघून गेला. विराट या फटक्यानंतर घाबरलेला दिसला आणि ऋतुराजजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. याच सामन्यात कोहलीने आणखी एक समोरून शॉट मारला होता. तो ऋतुराजच्या डोक्यावरून गेला होता.
Virat Kohli Into the 90s with a killer shot at Ruturaj gaikwad 😭😭😭😭
Next up the Three digit mark 🤞🎯#INDvsSA #ViratKohli𓃵 https://t.co/HQJMRe8fTD pic.twitter.com/aFUOaek0Ji
— SK Chatterjee 🚩 (@SChatterjee02) December 3, 2025
विराट कोहलीसाठी आता शतक काही नवीन नाही असंच क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. विराटने वनडेतील 54वं शतक ठोकलं. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 84वी शतकी खेळी केली. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने वनडे क्रिकेटमधील पहिलं शतक ठोकलं. त्याने 77 चेंडूत हे शतक ठोकलं. खरं तर ऋतुराज गायकवाड ओपनिंगला फलंदाजी करतो. पण चौथ्या क्रमांकावर येत त्याने शतकी खेळी केली. याचं श्रेय त्याने विराट कोहलीला दिलं. विराटने मदत केल्याचं ऋतुराजने सांगितलं.