
मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. अपेक्षेप्रमाणे जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा आणि केएल राहुल यांची संघात निवड झाली आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दृष्टीने हा संघ निश्चित आहे. निवड समिती अध्यक्ष अजित अगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी नवी दिल्लीत खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात संजू सॅमसन याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. संघात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांची निवड करण्यात आली आहे.या संघात लेग स्पिनर युजवेंद्र चहला याला पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. पत्रकार परिषदेत चहल याच्याबात रोहित शर्मा याला प्रश्न विचारण्यात आला. त्यामागचं कारण त्याने सांगितलं असून त्याचे संघातील रस्ते अजून खुले असल्याचं सांगितलं आहे.
रोहित शर्मा याला पत्रकारांनी युजवेंद्र चहल याच्याबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला की, टीमचा समतोल पाहता हा निर्णय घेण्यात आहे. चहलच्या जागेवर अक्षर पटेल याला संधी दिली आहे. अक्षर पटेल सध्या चांगली कामगिरी करत आहे. आठव्या किंवा नवव्या स्थानावर फलंदाजी करेल असा फलंदाज हवा असल्याचं त्याने सांगितलं. तसेच तो डावखुरा असल्याने टीमला त्याचा फायदा होईल. त्याला वरही फलंदाजीसाठी पाठवता येईल. तसेच संघातून वेगवान गोलंदाजांना बाहेर करू शकत नाही त्यामुळे चहलची निवड करण्यात आली आहे.
Here's the Rohit Sharma-led team for the upcoming #AsiaCup2023 🙌#TeamIndia pic.twitter.com/TdSyyChB0b
— BCCI (@BCCI) August 21, 2023
रोहित शर्माला ऑफ स्पिनर संघात नसल्याने प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रोहित शर्मा याने उत्तर दिलं की, “या प्रश्नावर आमची चर्चा झाली. पण अक्षर पटेलची निवड झाल्याने ऑफ स्पिनरची निवड न करण्याचा निर्णय घेतला. चहल असो की रविचंद्रन अश्विन की वॉशिंगटन सुंदर यांची वनडे वर्ल्डकपचे दरवाजे अजूनही खुले आहेत.”
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)