AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND Test Series 2023 | विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?

Team India Squad Against West Indies For Test Series | बीसीसीआयने वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. पाहा निवड समितीने विंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी कुणाला संधी दिली?

WI vs IND Test Series 2023 | विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 23, 2023 | 4:10 PM
Share

मुंबई | क्रिकेट टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टेस्ट सीरिज 2 सामन्यांची, वनडे सीरिज 2 मॅचची आणि टी 20 मालिका ही 5 सामन्यांची असणार आहे. बीसीसीआयने यापैकी कसोटी आणि एकदिवसीय या पहिल्या 2  मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही टेस्ट सीरिज असणार आहे. पहिला कसोटी सामना हा 12 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. या विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पयिनशीप 2023-25 मोहिमेला सुरुवात करणार आहे.

वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया

अजिंक्य रहाणे याच्याकडे उपकर्णधारपद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल निमित्ताने अजिंक्य रहाणे याने टीम इंडियात 17 महिन्यांनी कमबॅक केलं. आता रहाणेला विंडिज विरुद्ध मोठी जबाबदारी मिळाली आहे. रहाणेला उपकर्णधार करण्यात आलंय. रहाणेने wtc final 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चिवट खेळी करत टीम इंडियाची लाज राखली होती. रहाणेला त्याच्या या कामगिरीच बक्षिस मिळालंय.

चेतेश्वर पुजारा ‘आऊट’

तर दुसऱ्या बाजूला चेतेश्वर पुजारा याचा अखेर निवड समितीने पुन्हा एकडा डब्बा गूल केलाय. पुजारा याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये घोर निराशा केली. पुजाराने आयपीएल दरम्यान इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि शतकं ठोकली होती. त्यामुळे त्याच्याकडून या महाअंतिम सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र पुजारा अपयशी ठरला. त्यामुळे बीसीसीआयने अखेर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवलाय.

या तिघांना पहिल्यांदाच संधी

बीसीसीआयने या कसोटी मालिकेत 3 युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी दिली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार या तिघांचा समावेश आहे. यशस्वी आणि मुकेश हे दोघे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये राखीव खेळाडू होते. ऋतुराजला लग्नामुळे या महाअंतिम सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून ऋतुराजच्या अनुपस्थितीत यशस्वी याला संधी देण्यात आली होती.

नवदीप सैनी याचं कमबॅक

दरम्यान नवदीप सैनी याचं टीम इंडियात जवळपास अडीच वर्षांनी पुनरागमन झालंय. नवदीप अखेरचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी जानेवारी 2021 मध्ये खेळला होता. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नवदीपला संघात स्थान मिळालंय.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

1) विंडिज विरुद्ध टीम इंडिया, पहिली कसोटी, 12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका

2) विंडिज विरुद्ध टीम इंडिया, दुसरी कसोटी, 20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद.

विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी