WI vs RSA: विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने, कोण पोहचणार सेमी फायनलमध्ये?

West Indies vs South Africa T20 World Cup 2024: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांसाठी हा सामना क्वार्टर फायनसारखा आहे. इथे पराभूत होणाऱ्या संघाचं पॅकअप होणार तर विजेता संघ सेमी फायनलमध्ये पोहचणार आहे.

WI vs RSA: विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने, कोण पोहचणार सेमी फायनलमध्ये?
sa vs wi
| Updated on: Jun 24, 2024 | 12:10 AM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत सोमवारी 24 जून रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने भिडणार आहे. रोव्हमन पॉवेल विंडिजचं तर एडन मारक्रम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील तिसरा आणि शेवटचा सामना आहे. दक्षिण आफ्रिकेने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर विंडिजने 1 सामना जिंकला आणि 1 गमावला आहे. त्यामुळे हा तिसरा सामना क्वार्टर फायनलसारखा आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ हा थेट सेमी फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान तिथेच संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला सकाळी भारतीय वेळेनुसार 6 वाजता सुरुवात होईल. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. सामन्याचं आयोजन हे सर व्हीव्हीएन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड,एटिंगा येथे होणार आहे. सुपर 8 मधील ग्रुप 2 मधून इंग्लंडने यूएसएला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. इंग्लंड सेमी फायनमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. त्यामुळे आता या ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी दुसरी टीम कोण असणार हे चित्र पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे.

विंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

वेस्ट इंडिज टीम : रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेद मॅककॉय, शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड आणि कायले मेयर्स

दक्षिण आफ्रिका टीम : एडन मारक्रम (कॅप्टन), संघ क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, रायन रिकेल्टन, बीओएन, ब्योर्न फॉर्च्युइन आणि तबरेझ शम्सी.