WI vs SA 1st T20I Live Streaming: विंडिज-दक्षिण आफ्रिका पहिला सामना केव्हा आणि कुठे?

West Indies vs South Africa 1st T20i Live Streaming: कसोटी मालिकेनंतर आता वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका टी 20I मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. जाणून घ्या पहिला सामना कधी आणि कुठे?

WI vs SA 1st T20I Live Streaming: विंडिज-दक्षिण आफ्रिका पहिला सामना केव्हा आणि कुठे?
wi vs sa red ball
Image Credit source: AFP
| Updated on: Aug 22, 2024 | 10:46 PM

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका पार पडली. दक्षिण आफ्रिकने कसोटी मालिकेत विंडिज विरुद्ध 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. उभयसंघातील पहिला सामना हा अनिर्णित राहिला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या आणि अंतिम सामन्यासह मालिकाही जिंकली. दक्षिण आफ्रिकेचा हा विंडिज विरुद्धचा सलग दहावा कसोटी मालिका विजय ठरला. त्यानंतर आता दोन्ही संघ टी 20I मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघात एकूण 3 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना केव्हा आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कधी?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामन्याला शनिवारी (24 ऑगस्ट) होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना कुठे?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियममध्ये होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या सामन्याला रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 12 वाजता टॉस होईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20i मालिका भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला सामना मोबाईलवर फॅन कोड एपवर पाहायला मिळेल.

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 24 ऑगस्ट

दुसरा सामना, 25 ऑगस्ट

तिसरा सामना, 28 ऑगस्ट

सर्व सामने हे त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.

वेस्ट इंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), ॲलिक अथानाझे, फॅबियन ॲलन, जॉन्सन चार्ल्स, मॅथ्यू फोर्ड, शिमरॉन हेटमायर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ओबेद मॅककॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, शेरफेन रदरफोर्ड आणि रोमॅरियो शेफर्ड.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्रक्रम (कॅप्टन), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्गर, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, पॅट्रिक क्रुगर, क्वेना माफाका, विआन मुल्डर, लुंगी एन्गिडी, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रस्सेन ड्यूसेन आणि लिझाद विल्यम्स.