
मुंबई : टीम इंडियाचा किंग विराट कोहली याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचला आहे. आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीत शतक झळकावलं. विराट कोहली याने 84 चेंडूत शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीसह वनडे क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रमही मोडीत काढला आहे. विराट कोहली याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 77 वं शतक आहे. त्याचबरोबर पाकिस्तान विरोधात नाबाद 233 धावांची भागीदारी केली. विराट कोहली याने नाबाद 122 धावा केल्या. यात 9 चौकार आणि 3 षटकरांचा समावेश आहे. या जबरदस्त खेळीनंतर विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हीने इंस्टाग्रामवर खास स्टेटस ठेवलं आहे.
विराट कोहली याच्या शतकी खेळीनंतर पत्नी अनुष्का शर्मा हीने आनंद व्यक्त केला. स्टेटसला विराट कोहली यांचा शतकी खेळीनंतर फोटो ठेवत लिहिलं की, सुपर नॉक, सुपर गाय. त्याचबरोबर दुखापतीनंतर कमबॅक केलेल्या केएल राहुल याचंही कौतुक केलं आहे. केएल राहुल यानेही शतकी खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने राखीव दिवशी सामना खेळवला जात आहे. मात्र दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला तरी विराट आणि केएल राहुलचं वादळ मैदानात घोंगावलं. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी नाबाद 233 धावांची भागीदारी केली. या खेळीसह भारताने 50 षटकात 2 गडी गमवून 356 धावा केल्या आणि विजयासाठी 357 धावांचं आव्हान दिलं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.