AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही? गिलने स्पष्ट सांगितलं की…

शुबमन गिलकडे कसोटीनंतर आता वनडे संघाची धुरा सोपवली गेली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप खेळला जाणार हे निश्चित झालं आहे. असं असताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय? खेळणार की नाही? शुबमन गिलचं म्हणणं काय ते जाणून घ्या.

रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही? गिलने स्पष्ट सांगितलं की...
रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही? गिलने स्पष्ट सांगितलं की... Image Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Oct 09, 2025 | 4:50 PM
Share

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी-टी20 फॉर्मेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. त्यात वनडे संघाचा कर्णधार बदलल्याने मोठी उलथापालथ झाली आहे. आता या दोघांच्या वनडेतील जागेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दोघांचं वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याबाबत संभ्रम आहे. हा प्रश्न प्रत्येक भारतीय खेळाडूंच्या डोक्यात घर करून आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिलने काही संकेत दिले आहेत. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. शुबमन गिलने पत्रकार परिषदेत विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत वक्तव्य केलं. त्याच्या वक्तव्यातून विराट कोहली आणि रोहित शर्माचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. शुबमन गिलला रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने दोघांची टीम इंडियाला गरज असल्याचं सांगितलं.

शुबमन गिल म्हणाला की, ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. खूप कमी लोकांककडे इतकी प्रतिभा आणि अनुभव आहे. आम्हाला त्यांची वनडे संघात गरज आहे.’ शुबमन गिलच्या या वक्तव्यातून या दोघांच्या भविष्याचा अंदाज बांधला जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या रणनितीचा भाग असणार आहेत. शुबमन गिलने सांगितलं की, रोहित शर्माच्या कर्णधारपदाखाली बरंच काही शिकलो आहे. खेळाडूंशी मैत्री करण्यात आणि ड्रेसिंग रूममध्ये शांतता राखण्यात त्याचे अनुकरण करू इच्छितो.

शुबमन गिलकडे आता आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या काही संधी आहेत. शुबमन गिलकडे टी20 वर्ल्डकपनंतर संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच तिन्ही फॉर्मेटमध्ये संघाची बाजू सावरू शकतो. असं असताना वनडे वर्ल्डकप 2027, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027, टी20 वर्ल्डकप 2028 आणि ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याची संधी आहे. असं असताना शुबमन गिलने स्पष्ट केलं की, प्रत्येक फॉर्मेटमध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकू इच्छितो.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक