WIND vs WIND 3rd T20i | ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली

India Women vs Australia Women 3rd T20I Highlights | ऑस्ट्रलियाने भारत दौऱ्याची सांगता ही मालिका विजयाने केली आहे. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी 20 सह मालिकाही जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने याआधी टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेतही पराभूत केलं होतं.

WIND vs WIND 3rd T20i | ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय, मालिकाही जिंकली
| Updated on: Jan 09, 2024 | 10:39 PM

नवी मुंबई | वूमन्स ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने टीम इंडिया विरुद्धचा तिसरा आणि अंतिम टी 20 सामना हा 7 विकेट्सने जिंकला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-1 अशा फरकाने जिंकली. तर टीम इंडियाला वनडेनंतर टी 20 मालिकाही गमवावी लागली आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने 148 धावांचा पाठलाग करताना जोरात सुरुवात केली. कॅप्टन एलिसा हीली आणि बेथ मूनी या सलामी जोडीने 85 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर एलिसा हीली अर्धशतक केल्यानंतर आऊट झाली. एलिसाने 38 बॉलमध्ये 55 धावांची खेळी केली. एलिसाने या दरम्यान 1 सिक्स आणि 9 चौकार लगावले.

त्यानंतर पूजा वस्त्राकर हीने ऑस्ट्रेलियाला 16 व्या ओव्हरमधील पहिल्या 2 बॉलवर 2 झटके दिले. पूजाने ताहलिया मॅकग्रा हीला 20 आणि एलिसा पेरीला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर बेथ मूनी आणि फोबी लिचफील्ड या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. फोबी लिचफील्ड हीने नाबाद 52 धावांची खेळी केली. तर फोबी लिचफील्ड 20 धावांवर नाबाद परतली. टीम इंडियाकडून पूजा वस्त्राकर हीने 2 विकेट्स घेतल्या. तर दीप्ती शर्मा हीला 1 विकेट मिळाली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने रिचा घोष हीने केलेल्या 34 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 147 पर्यंत मजल मारली. तर ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेरहॅम या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एश्ले गार्डनर आणि मेगन शूट या दोघींना 1-1 विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली


टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग आणि तितास साधू.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम, किम गर्थ आणि मेगन शूट.