
मुंबई | टीम इंडियाने आशिया कप 2023 फायनलमध्ये आपल्या गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेवर 10 विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 50 ओव्हर्सचा सामना हा अवघ्या 20 ओव्हरच्या आतच संपवला. टीम इंडियाच्या मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी श्रीलंकेला अवघ्या 50 ओव्हरमध्ये गुंडाळलं. जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेत सुरुवात करुन दिली. त्यानंतर मोहम्मद सिराज याने एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेत श्रीलंकेच्या बॅटिंगचा कणा मोडला. त्यानंतर अधेमधे हार्दिक पंड्या याने विकेट घेत 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सिराजने या 4 विकेट्सनंतर आणखी 2 विकेट्स घेत श्रीलंकेचं 50 धावांमध्ये पॅकअप केलं.
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या याने 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह याने 1 विकेट घेतली. तर त्यानंतर शुबमन गिल आणि ईशान किशन या सलामी जोडीने 51 धावा करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने 2018 नंतर आशिया कप जिंकला. या स्पर्धेत श्रीलंकेने फायनलपर्यंत चांगली कामगिरी केली. मात्र टीम इंडियासमोर श्रीलंकेने गुडघे टेकले. या स्पर्धेत सुपर 4 मधील बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि टीम इंडिया या चारही संघातील निवडक खेळाडूंनी चमकदार कामगिरीच्या जोरावर छाप सोडली.
आशिया कप पार पडल्यानंतर विस्डन क्रिकेटने स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केलेल्या 11 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विस्डन क्रिकेटने आशिया कप 2023 टीम निवडली आहे. यात टीम इंडियाच्या सर्वाधिक 6 खेळाडू आहेत. श्रीलंका टीमचे 2 खेळाडू आहेत. तर पाकिस्तानच्या 2 खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर बांगलादेशच्या एकमेव खेळाडूला संधी मिळाली. मात्र या टीममध्ये टीम इंडियाच्या विराट कोहली याला संधी मिळालेली नाही.
विस्डन टीममध्ये टीम इंडियाच्या रोहित शर्मा, केएल राहुल, शुबमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या 6 जणांचा समावेश आहे. श्रीलंकमधून दुनिथ वेल्लालागे आणि कुसल मेंडीस यांना निवडण्यात आलंय. तर बांगलादेशचा कर्णधार ऑलराउंडर शाकिब अल हसन याला संधी दिली आहे.
विस्डन आशिया कप 2023 टीम ऑफ टुर्नामेंट | रोहित शर्मा, शुभमन गिल, कुसल मेंडिस, मोहम्मद रिजवान, केएल राहुल, शाकिब अल हसन, हार्दिक पांड्या, दुनिथ वेललगे, हारिस रऊफ, कुलदीप यादव और मोहम्मद सिराज.