IND vs UAE: वूमन्स इंडियाची आशिया कपमधील सर्वोच्च धावसंख्या, हरमनप्रीत-रिचाची अर्धशतकी खेळी, यूएईला 202 रन्सचं टार्गेट
India Women vs United Arab Emirates Women 1st Innings: टीम इंडियाने कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघींच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 200 पार मजल मारली आहे.

वूमन्स इंडिया टीमने आशिया कप 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. इंडिया विरुद्ध यूएई हे स्पर्धेतील पाचव्या सामन्यात आमनेसामने आहेत. टीम इंडियाने या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. तर शफाली वर्मा हीने 37 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली.
यूएईने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने मिळालेल्या बॅटिंगच्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. टीम इंडियाने पहिल्या 3 विकेट्स 52 धावांवर गमावल्या. स्मृती मंधाना 13, शफाली वर्मा 37 आणि हेमलथा 2 धावांवर बाद झाली. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती 5.1 ओव्हरमध्ये 3 बाद 52 अशी झाली. त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 54 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर जेमिमाह 13 बॉलमध्ये 14 धावा करुन आऊट झाली.
त्यानंतर हरमनप्रीत आणि रिचा घोष या दोघींनी तडाखेदार बॅटिंग केली. दोघींनी चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकं झळकावली. मात्र हरमनप्रीत 20 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर रन आऊट झाली. हरमनप्रीतने 47 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 66 धावा केल्या. तर त्यानंतर अखेरच्या काही चेंडूत रिचाने काही चौकार ठोकून टीम इंडियाला 200 पार नेलं. रिचाने 29 बॉलमध्ये 12 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 64 धावा केल्या. तर यूएईकडून कविशा एगोडागे हीने 2 विकेट्स घेतल्या. तर समाइरा धरणीधरीका आणि हीना होतचंदानी या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रेणुका ठाकुर सिंग आणि तनुजा कंवर.
वूमन्स यूएई प्लेइंग ईलेव्हन: ईशा रोहित ओझा (कॅप्टन), तीर्थ सतीश (विकेटरकीपर), रिनीता राजित, समायरा धरणीधारका, कविशा इगोडागे, खुशी शर्मा, हीना होतचंदानी, वैष्णवे महेश, रितीका राजित, लावण्य केणी आणि इंधुजा नंदकुमार.
