
वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेपाळ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना हा रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. स्मृती मंधाना टीम इंडियाचं नेतृत्व करतेय. तर इंदू बर्मा हीच्याकडे नेपाळचं नेतृत्व करतेय. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाची कॅप्टन स्मृती मंधाना हीने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी 2 बदल केले आहेत.
नेपाळ आणि टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 2 बदल केले आहेत. टीम इंडियाकडून नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर या दोघींना विश्रांती देण्यात आली आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना ही हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत नेतृत्व करत आहे. त्यामुळे कॅप्टन म्हणून स्मृतीच्या कामगिरीकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
दरम्यान टीम इंडियाला नेपाळवर मात करत विजयी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. टीम इंडिया वूमन्स आशिया कप स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने पाकिस्तान आणि त्यानंतर यूएईचा पराभव केला. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. आता टीम इंडियाने नेपाळचा पराभव करत विजयी हॅटट्रिक साजरी करावी आणि अधिकृतपणे सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवावा, याची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.
स्मृतीकडे भारतीय संघाची जबाबदारी
🚨 Playing XI 🚨@mandhana_smriti leads the side tonight 👌
Follow the match ▶️ https://t.co/PeRykFLdTV#TeamIndia | #INDvNEP | #WomensAsiaCup2024 | #ACC pic.twitter.com/aebbSbyJr7
— BCCI Women (@BCCIWomen) July 23, 2024
नेपाळ वूमन्स प्लेइंग ईलेव्हन: इंदू बर्मा (कॅप्टन), समझ खड्का, सीता राणा मगर, कविता कुंवर, डॉली भट्टा, रुबिना छेत्री, पूजा महतो, कविता जोशी, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), सबनम राय आणि बिंदू रावल.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, एस सजना, राधा यादव, तनुजा कंवर, रेणुका ठाकूर सिंग आणि अरुंधती रेड्डी.