BAN vs SCO : वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं, नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड या संघात होत आहे. पहिल्या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला.

BAN vs SCO : वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं, नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने
| Updated on: Oct 03, 2024 | 3:25 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला. बांगलादेशची कर्णधार निगार सुल्तानाने फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच नाणेफेकीनंतर निर्णय घेण्याचं कारणही सांगितलं. ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. परिस्थिती पाहून फलंदाजी चांगली होईल, असे वाटते. आम्ही चांगली तयारी केली आहे. सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्धचा विजय आमच्यासाठी खूप छान होता. बांगलादेशात क्रिकेटचा विकास चांगला होत आहे. आम्ही ते दाखवण्यासाठी आलो आहोत.’ त्यानंतर स्कॉटलँडची कर्णधार कॅथरीन ब्राइस हीने आपलं मत मांडलं. ‘आम्हीही नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी केली असती, पण आता धावांचा पाठलाग करण्यास उत्सुक आहोत. येथे चांगली परिस्थिती आहे. उष्णता ही कदाचित मुख्य गोष्ट आहे. हे पूर्णपणे विलक्षण आहे, सर्व माध्यमांसह व्यस्त आहे. प्रत्येक जण खरोखरच उत्साहित आहे आणि पुढे जाण्यासाठी तयार आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

स्कॉटलंड वुमन्स (प्लेइंग इलेव्हन): सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), कॅथरीन ब्राइस (कर्णधार), आयल्सा लिस्टर, प्रियानाझ चॅटर्जी, डार्सी कार्टर, लोर्ना जॅक, कॅथरीन फ्रेझर, रेचेल स्लेटर, अबताहा मकसूद, ऑलिव्हिया बेल.

बांगलादेश वुमन्स (प्लेइंग इलेव्हन): मुर्शिदा खातून, शाठी राणी, शोभना मोस्तारी, निगार सुल्ताना (विकेटकीपर/कर्णधार), ताज नेहर, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, मारुफा अख्तर.

बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात ब गटातील हा पहिला सामना आहे. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजता अ गटात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. स्पर्धेसाठी दहा संघ सहभागी होणार आहेत. पाच-पाच असेल दोन गट पाडले आहेत. साखळी फेरीत टॉपला असलेले दोन संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील.  उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघाच्या वाटेला 4 सामने येणार आहेत. तीन सामने जिंकलं की उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होणार आहे.  त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच ही चुरस पाहायला मिळणार आहे.