
मुंबई | ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने रविवारी 19 नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाने यासह वर्ल्ड कप जिंकला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 241 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाची या पराभवामुळे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं प्रतिक्षा आणखी वाढली. तसेच टीम इंडियाला कांगारुंवर विजय मिळवत 20 वर्षांआधीच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाचा वचपा घेण्याची संघी होती. ही संधीही टीम इंडियाने गमावली. ऑस्ट्रेलिया विश्वविजेता ठरल्यानंतर आता आयसीसीने टीम ऑफ टुर्नामेंटची घोषणा केली आहे. आयसीसी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये एकूण 12 खेळाडूंचा समावेश आहे. या 12 पैकी 6 भारतीय खेळाडू आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी 2 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेच्या 1-1 खेळाडूला या टीममध्ये स्थान मिळवण्यात यश आलं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा यालाच टीम ऑफ टुर्नामेंटचा कर्णधार करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आयसीसीने 12 खेळाडूंची निवड केली आहे. या 12 खेळाडूंमध्ये कोणकोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात.
रोहित शर्मा – 597 धावा.
विराट कोहली – 765 धावा.
केएल राहुल – 452 धावा.
रवींद्र जडेजा – 120 धावा आणि 16 विकेट्स
जसप्रीत बुमराह – 20 विकेट्स.
मोहम्मद शमी – 24 विकेट्स.
ग्लेन मॅक्सवेल – 400 धावा.
एडम झॅम्पा – 23 विकेट्स.
क्विंटन डी कॉक – 594 धावा.
गेराल्ड कोएत्झी – 20 विकेट्स.
डॅरेल मिचेल – 552 धावा.
दिलशान मधुशंका – 21 विकेट्स.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 टीम ऑफ टुर्नामेंट
Best of the best 😍
Revealing the official CWC23 Team of the Tournament 👇https://t.co/WBmJnsdZ0e
— ICC (@ICC) November 20, 2023
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 टीम ऑफ टुर्नामेंट | रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ग्लेन मॅक्सवेल, एडम झॅम्पा, क्विंटन डी कॉक, गेराल्ड कोएत्झी, डॅरेल मिचेल आणि दिलशान मधुशंका.