World Cup 2023 | भारतात वर्ल्ड कप खेळवण्याच्या वादावरुन बाबर आझम म्हणाला….

| Updated on: Mar 04, 2023 | 10:19 PM

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. मात्र बीसीसीआय सचिव आणि एसीसी प्रमुख जय शाह यांनी ऑक्टोबर 2022 मध्येच पाकिस्तानला जाणार नसल्याची भूमिका घेतली होती.

World Cup 2023 | भारतात वर्ल्ड कप खेळवण्याच्या वादावरुन बाबर आझम म्हणाला....
Follow us on

मुंबई | भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उभयसंघात क्रिकेट मालिकेचं आयोजन करण्यात आलेलं नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धेत खेळतात. मात्र आशिया कपचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आल्याने टीम इंडियाचा तिथे खेळण्यास नकार आहे. तर याच भूमिकेवरुन चिडून आम्ही पण भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, अशी धमकीही पाकिस्तानकडून देण्यात आली होती.

भारताच्या नकारानंतर माजी पीसीबी चीफ रमीज राजा यानी टोकाची भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर विद्यमान पीसीबी चीफ नजीम सेठी यांनी एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्यात बैठकही पार पडली. मध्यंतरी हा वाद पेटला होता. आता पाकिस्तानचा बाबर आझम याने या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

बाबर काय म्हणाला?

“मी आणि मोहम्मद रिझवान वर्ल्ड कपमध्ये धावा करण्याचा प्रयत्न करु. मात्र दरवेळेस आमच्यासाठी धावा करणं हे सोपं नाही. त्यासाठी आमच्या व्यतिरिक्त टीममधील प्रत्येकाने स्पर्धेत धावा करायला हव्यात”, असं बाबर म्हणाला. बाबर आझमने जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आगामी वर्ल्ड कप 2023 बाबत प्रतिक्रिया दिली. तसेच विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली.

हे सुद्धा वाचा

“सकारात्मक विचार”

“टीका होतच असते. समोरच्या व्यक्तीने आपल्या बाजूने बोलावं हे शक्य नाही. मी नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. तसं केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो”, असंही बाबरने स्पष्ट केलं.

पाकिस्तानची धमकी

आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये करण्यात आलं आहे. मात्र बीसीसीआय सचिव आणि एसीसी प्रमुख जय शाह यांनी ऑक्टोबर 2022 मध्येच पाकिस्तानला जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. यानंतर पाकिस्तानने आम्ही पण भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नाही, अशी धमकी दिली होती. पीसीबीचे माजी प्रमुख रमीज राजा यांनी ही धमकी दिली होती.

टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी

आशिया कपच आयोजन सप्टेंबरमध्ये होणार आहे. एकूण 6 संघ या टुर्नामेंटमध्ये खेळताना दिसतील. यावेळी टुर्नामेंट वनडे फॉर्मेटमध्ये होईल. टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी करण्यात आलीय. एसीसी बनवलेल्या फॉर्मेटनुसार, भारत-पाकिस्तानचा सामना निश्चित आहे.