AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानला बसला धक्का, गुणतालिकेत झाला असा बदल

World Cup 2023 Points Table : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने चांगल्या चांगल्या संघांची बोलती बंद केली आहे. इंग्लंड, पाकिस्ताननंतर श्रीलंकेला पराभूत केलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. तसेच पाकिस्तानला धक्का बसला आहे.

World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानला बसला धक्का, गुणतालिकेत झाला असा बदल
World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानमुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, जर तरचं गणित आणखीन किचकट झालंImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 30, 2023 | 11:14 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत तिसरा मोठा उलटफेर केला आहे. पुण्याच्या एमसीए मैदानात श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजलं. श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. या पराभवामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचं नुकसान झालं आहे. दोन्ही संघांचा उपांत्य फेरीचा प्रवास किचकट झाला आहे. आता जर तर शिवाय मोठा चमत्काराची गरज पाकिस्तानला आहे. अफगाणिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. श्रीलंका सहाव्या, तर पाकिस्ता सातव्या स्थानावर आहे. भारताचं उपांत्य फेरीचं स्थान निश्चित झालं आहे. त्याचबरोबर बांगलादेश आणि इंग्लंडचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

भारतीय संघाने सहा सामने जिंकत 12 गुण आणि +1.405 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. दक्षिण अफ्रिकेनं 5 सामन्यात विजय मिळवत 10 गुण आणि +2.032 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंड 8 गुण आणि +1.232 नेट रनरेटसह तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया 8 गुण आणि +0.970 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी हे चार संघ पात्र होतील असं चित्र आहे. पण एखादा मोठा उलटफेर झाला तर बदल होऊ शकतो.

संघ सामने विजय पराभव गुणनेट रनरेट
भारत77014+2.102
दक्षिण अफ्रिका76112+2.290
ऑस्ट्रेलिया75210+0.924
न्यूझीलंड8448+0.398
पाकिस्तान8448+0.036
अफगाणिस्तान7438-0.330
श्रीलंका 7254-1.162
नेदरलँड्स7254-1.398
बांगलादेश7162-1.446
इंग्लंड7162-1.504

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रत्येक संघाचे तीन सामने उरले आहेत. म्हणजेच सातवा टप्पा आता सुरू होणार आहे. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावरील संघांचा एखाद्या सामन्यात पराभव झाला तर उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात येईल.सातव्या टप्प्यात पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा पराभव केला तर पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात येईल.

रॉबिन राउंड अर्थात साखळी फेरीत प्रत्येक संघ 9 सामने खेळणार आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाचे सहा सामने खेळून झाले आहेत. टीम इंडिया हा एकमेव संघ असा आहे की एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही. गुणतालिकेतील एक नंबरचा संघ चौथ्या क्रमांकाशी, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या लढत उपांत्य फेरीत होणार आहे. उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबरला होईल. अंतिम फेरीचा सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा