
मुंबई : वर्ल्ड कपमधील भारत आणि अफगाणिनस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा याने दमदार शतक केलंय. अफगाणिस्तान संघाने दिलेल्या 273 धावांचा पाठलाग करताना रोहितने सुरूवातीपासूनच तोडफोड फलंदाजी करत वन डे मधील 31 शतक पूर्ण केलं आहे. रोहित शर्मा याने या शतकासह अनेक विक्रम मोडले असून यामध्ये हिट-मॅनने 40 वर्षांपूर्वीची कपिल देव यांचाही एक रेकॉर्ड मोडत आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्मा याने अवघ्या 63 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं आहे. या विक्रमी शतकासह रोहित वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतके करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. रोहितने सर्वाधिक ७ शतके केली असून त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा ६ शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. यासह रोहितने माजी कर्णधार कपिल देव यांचा 40 वर्षांचा रेकॉर्डही ब्रेक केलाय.
कपिल देव यांनी 72 बॉलमध्ये झिम्बाब्बेविरूद्ध 1983 मध्ये शतक केलं होतं. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग याने 81 (2007) तर विराट कोहलीने 82 (2011) बॉलमध्ये शतक केलं होतं. कपिल देव यांचा रेकॉर्ड कोणीही मोडला नव्हता. आता रोहितने अवघ्या 63 बॉलमध्ये शतक करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 84 बॉलमध्ये 131 धावांची खेळी केली यामध्ये 16 चौकार 5 षटकार मारले.
Fastest century for India in the World Cup:
Rohit Sharma – 63 balls.
Kapil Dev – 72 balls.
– Take a bow, Hitman! #century #Hitman #rohitsharma #BCCI #bhumrah #HardikPandya #hundred #रोहित #arunjetalistadium #WorldCup2023 pic.twitter.com/trSxiFAvoq
— Surya (@SureshBChaudhay) October 11, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (C), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (C), रहमानउल्ला गुरबाज (W), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.