World Cup : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाचा टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू सर्वात गरीब क्रिकेटर

जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या क्रिकेट मंडळामधील एक भारतीय खेळाडू गरीब आहे. तसं पाहायला गेलं तर तो खेळाडू भारतासाठी खास असून त्याने अनेक सामन्यांमध्ये भारताला कमबॅक करून दिलं आहे. तो खेळाडू नेमका आहे तरी कोण जाणून घ्या.

World Cup : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाचा टीम इंडियातील हा खेळाडू सर्वात गरीब क्रिकेटर
| Updated on: Nov 10, 2023 | 4:16 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघ दमदार कामगिरी करत असून आता दोन विजय ट्रॉफीपासून दूर आहे. पॉईंट टेबलमध्ये टॉपला असलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. येत्या 15 तारखेला भारताचा सामना नेदरलँडविरूद्ध असून मुंबईच्या वानखेडेवर हा सामना पार पडणार आहे. भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपली सर्वोत्तम प्रदर्शन यंदाच्या वर्ल्डकपमध्ये केल आहे. बीसीसीआय निवड समितीने निवडलेला संघ आतापर्यंत खतरनाक फॉर्ममध्ये असलेला पाहायला मिळालाय. वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमधील खेळाडूंमधील एक खेळाडू असा आहे ज्याचं मानधन सर्वात कमी आहे.

कोण आहे तो खेळाडू?

भारतीय संघामधील हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून शार्दूल ठाकूर आहे. शार्दुलने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये तीन सामने खेळले मात्र त्याला वेगळी छाप पाडता आली नाही. सुरूवातीला शार्दुल अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये होता. या तीन सामन्यांमध्ये त्याने 2 विकेट मिळवल्या. शार्दुलची खास बात म्हणजे गडी आल्या आल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतो. बीसीसीआयकडून शार्दुल ठाकूर याला किती मानधन आहे जाणून घ्या.

शार्दुल याला बीसीसीआयकडून एक वर्षाला एक कोटी रूपये इतकं मानधन आहे. आयपीएलमध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 10.75 कोटी रूपयांना विकत घेतलं होतं. शार्दुलची एकूण मालमत्ता 25 कोटी इतकी आहे. भारताचा सर्वात श्रीमंत खेळाडू विराट कोहली याच्या संपत्तीच्या 40 पटीने शार्दुलची मालमत्ता कमी आहे. तसं पाहायला गेलं तर दोघांची बरोबरी करता येणार नाही. कोहली गेल्या दहा ते बारा वर्षांपासून तिन्ही फॉरमॅटमधील संघात खेळत आहे. शार्दुलला प्रत्येक सामन्यामध्ये खेळायलाही मिळत नाही.

दरम्यान, शार्दुल ठाकूर याने आतापर्यंत कसोटीमध्ये 30, वन डेमध्ये 65 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. तर कसोटीमध्ये 305, वन डेमध्ये 329 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 69 धावा केल्या आहेत.