
वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकत प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. भारताला 20 ओव्हरही खेळू न देता 119 वर गुंडाळलं. या सामन्याता किंग कोहलाही अपयशी ठरला. विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना अपेक्षा होत्या. मात्र अवघ्या चार धावा काढून तो आऊट झाला. मात्र याचा त्याला चांगलाच फटका बसला असून त्याच्या करियरला डाग लागला आहे.
विराट कोहलीला दुहेरी धावसंख्याही ओलांडता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध 1 धाव करता आली होती. वर्ल्ड कपमध्ये कोहली पहिल्यांदाच सलग दोन सामन्यात त्याला दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. पाकिस्तानविरूद्ध नेहमी चमकदार कामगिरी करणारा विराट आज दुसऱ्यांदा लवकर आऊट झाला. 2012 मध्ये टी-20 मालिकेत कोहली नऊ धावांवर बाद झाला होता.
विराट कोहली याची वर्ल्ड कपमधील तिसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. 2024 मध्ये म्हणजेच या वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात 1 धाव काढून आऊट झाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 2 धावा तर आज पाकिस्तानविरूद्ध 4 धावांवर आऊट झाला. आजच्या सामन्यात लवकर बाद झाल्याने त्याची वर्ल्ड कपमधील तिसरी सर्वात कमी धावांची खेळी ठरली आहे.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग