IPL 2021: जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये, ‘या’ खेळाडूच्या जागी खेळणार

| Updated on: Aug 26, 2021 | 1:17 PM

उर्वरीत आयपीएलला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. या पर्वात काही नवे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. या खेळाडूंमध्ये जगातील अव्वल क्रमाकांचा गोलंदाज राजस्थान रॉयल्समध्ये खेळताना दिसणार आहेत.

IPL 2021: जगातील नंबर 1 टी-20 बोलर राजस्थान रॉयल्समध्ये, या खेळाडूच्या जागी खेळणार
राजस्थान रॉयल्स
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. सर्व संघ आपआपली रणनीती तयार करत आहेत. दरम्यान राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाजाला संघात समाविष्ट केलं आहे. हा खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिका संघाचा तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi). आयपीएलच्या (IPL 2021) उर्वरीत पर्वात तबरेज शम्सी हा राजस्थानचा वेगवान गोलंदाज अँड्रयू टायच्या (Andrew Tye) जागी खेळताना दिसणार आहे. टायने उर्वरीत आयपीएलमधून कोरोनाच्या कारणामुळे माघार घेतली आहे.

टाय हा एक वेगवान गोलंदाज असून शम्सी हा चायनामन गोलंदाज आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ बऱ्याच दिवसांपासून एका चांगल्या फिरकीपटूच्या शोधात होता. सध्या त्यांच्याकडे राहुल तेवतिया, मयंक मार्कंडे, श्रेयस गोपाल हे भारतीय फिरकीपटू आहेत. पण त्यांना एका अनुभवी आणि अव्वल दर्जाच्या फिरकीपटूची गरज होती. तबरेजच्या रुपात त्यांना हा खेळाडू भेटला आहे. 31 वर्षीय शम्सी याआधीही आयपीएलमध्ये खेळला आहे. 2016 च्या पर्वात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून खेळला आहे.

जगातील नंबर एकचा बोलर

सध्याच्या घडीला शम्सी हा अव्वल क्रमाकांचा टी-20 बोलर आहे. त्याने दक्षिण आफ्रीका संघाकडून 39 टी-20 सामन्यात 45 विकेट्स घेतले आहेत. डावखुऱ्या शम्सीने 2017 मध्य इंग्लंड संघाविरुद्ध टी-20 डेब्यू केला होता. 27 एकदिवसीय सामन्यात शम्सीने 32 विकेट्स घेतले आहेत. त्याने या अप्रतिम कामगिरीने 792 गुणांसह आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे.

हे ही वाचा –

VIDEO : इंग्लंडच्या T20 Blast मध्ये दिसली धोनीची झलक, ‘या’ खेळाडूने उडवला ‘सेम टू सेम’ हेलिकॉप्टर शॉट

IPL 2021 पूर्वीच धोनीने उडवले उंच षटकार, मग स्वत:च गेला झाडात चेंडू शोधायला, पाहा मजेशीर VIDEO

(Worlds Number 1 t20 bowler tabraiz shamsi joins rajasthan royals replaces andrew tye in ipl 2021)