Issy Wong Hat Trick | इस्सी वाँग हीचा धमाका, WPL 2023 मध्ये हॅटट्रिक घेत रचला इतिहास

वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इसी वाँग हीने यूपी वॉरियर्स विरुद्ध हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

Issy Wong Hat Trick | इस्सी वाँग हीचा धमाका, WPL 2023 मध्ये  हॅटट्रिक घेत रचला इतिहास
| Updated on: Mar 25, 2023 | 1:13 AM

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स टीमच्या इस्सी वाँग हीने कारनामा केला आहे. प्रत्येक गोलंदाजाचं आपल्या करिअरमध्ये एकदा तरी अशी कामगिरी करण्याचं स्वप्न असतं, ते म्हणजे हॅटट्रिक घेणं. ते स्वप्न मुंबई इंडियन्सच्या इस्सी वाँग हीने पूर्ण केलंय. इस्सी वाँग हीने यूपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात 3 बॉलमध्ये 3 विकेट्स घेत ऐतिहासिकी कामगिरी केली आहे. यासग इस्सी हीने वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत हॅटट्रिक घेणारी पहिला महिला गोलंदाज हा बहुमान मिळवला आहे.

इस्सी वाँग हीचा कारनामा

इस्सी वाँग हीने आधीच 2 ओव्हर टाकून 11 धावा देत एलिसा हीली हीची महत्वाची विकेट घेतली. त्यानंतर मुंबई विकेटच्या शोधात होती. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने इस्सी वाँग हीला यूपीच्या डावातील 13 वी ओव्हर टाकायला दिली.

इस्सीने हा विश्वास सार्थ ठरवलाच. तिने फक्त विकेट घेत मुंबईला ब्रेक थ्रूच मिळवून दिला नाही, तर सामनाही पालटला. इस्सीने या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर किरण नवगिरे हीला बाऊंड्री लाईनवर कॅच आऊट केलं. त्यानंतर सिमरन शेख हीला यॉर्कर बॉल टाकत बोल्ड केलं. अशा प्रकारे इस्सीने 2 बॉलमध्ये सलग 2 विकेट्स घेतल्या.

इस्सी आता हॅटट्रिकवर होती. समोर होती सोफी एक्लेस्टन, जी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करते. मात्र इस्सीला सूर सापडलेला होता. इस्सीने सोफीच्या दांड्या गूल करत हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला. अशा पद्धतीने इस्सी वूमन्स प्रीमिअर लीगमध्ये हॅटट्रिक घेणारी पहिली गोलंदाज ठरली.

इस्सीने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 3.80 च्या इकॉनॉमी रेटने 15 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. इस्सीच्या या कामगिरीमुळे या सामन्याला कलाटणी मिळाली.

इस्सी वाँग हॅटट्रिक

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

यूपी वॉरियर्स | अलिसा हिली (विकेटकीपर आणि कॅप्टन), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्श्वी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड.