WPL 2024 : दुसऱ्या पर्वात कोणाला मिळाला पुरस्कार आणि बक्षीसाची रक्कम जाणून घ्या

| Updated on: Mar 18, 2024 | 3:30 PM

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाच्या जेतेपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाव कोरलं. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर पुरस्काराचं वाटप करण्यात आलं. चला जाणून घेऊयात कोणाला कोणता पुरस्कार मिळाला आणि किती मानधन मिळालं ते..

1 / 13
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या रुपाने दुसरा विजेता मिळाला. अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. बंगळुरुने 8 गडी राखून दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला आहे.

2 / 13
दुसऱ्या पर्वात उदयोन्मुख खेळाडू म्हणून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची श्रेयंका पाटील हीचा सन्मान करण्यात आला. श्रेयंकाला पुरस्कारासह 5 लाख रुपयांचं मानधन मिळालं.

3 / 13
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एलिस पेरीने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. एलिस पेरीने 347 धावा केल्याने तिला ऑरेंज कॅप मिळाली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडूला 5 लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं.

4 / 13
स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम श्रेयंका पाटीलच्या नावावर राहिला. तिने एकूण 12 गडी बाद केले. त्यामुळे तिचा पर्पल कॅपने सन्मान करण्यात आला आणि 5 लाखांचं मानधन देण्यात आलं.

5 / 13
सामन्यात सर्वोत्कृष्ट स्ट्राईक असलेल्या आरसीबीच्या जॉर्जिया वेरेहमचाही सन्मान करण्यात आला. तिला मानचिन्हासह 5 लाखांचं मानधन देण्यात आलं.

6 / 13
अंतिम सामन्यात सोफी मोलिनेक्स ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. तिने महत्त्वाचे तीन गडी बाद करून सामन्याच रुपडं पालटलं होतं. तिला मानचिन्ह आणि 2.5 लाखरुपये दिले गेले.

7 / 13
सर्वाधिक षटकार मारण्याचा मान दिल्ली कॅपिटल्सच्या शफाली वर्माला मिळाला. यासाठी तिला मानचिन्ह आणि 5 लाख रुपयांचं मानधन देण्यात आलं. तिने या स्पर्धेत एकूण 20 षटकार मारले.

8 / 13
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वोत्कृष्ट झेल पकडल्याप्रकरणी मुंबई इंडियन्सच्या एस सजनाचा सन्मान करण्यात आला. तिला मानचिन्हासह पाच लाख रुपये देण्यात आले.

9 / 13
यूपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील मौल्यवान खेळाडू ठरली. दीप्तीला मानचिन्ह आणि 5 लाख रुपयांच बक्षीस देण्यात आलं

10 / 13
अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा मान दिल्ली कॅपिटल्सच्या शफाली वर्माला मिळाला. या सामन्यात तिने तीन षटकार मारले होते. यासाठी तिला 1 लाख रुपये मिळाले.

11 / 13
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संपूर्ण स्पर्धेत खेळीमेळीने खेळल्याने फेअर प्ले अवॉर्ड देण्यात आला. आरसीबी संघाला यासाठी 5 लाख रुपयांचं मानधन मिळालं.

12 / 13
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात जेतेपद मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला 6 कोटी रुपयांचं मानधन मिळालं.

13 / 13
उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला ट्रॉफीसह 3 कोटी रुपये मिळाले. दिल्ली कॅपिटल्सचं सलग दुसऱ्यांदा जेतेपद हुकलं.