
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील 17 सामन्यात गुजरात जायंट्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. नाणेफेकीचा कौल गुजरात जायंट्सच्या बाजूने लागला त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या डावात विजय मिळवायचा असेल तर धावा अधिक असणं गरजेचं आहे याचं भान होतं. त्यामुळेच मेग लेनिंग आणि शफाली वर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी मिळून 83 धावांची भागीदारी केली. 27 चेंडूत 40 धावा करून शफाली वर्मा बाद झाली. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची पडझड सुरु झाली. जोनासेन आणि जेमिमा रॉड्रिक्स स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेली अनाबेल सदरलँडही काही खास करू शकली नाही. दुसऱ्या बाजूने मेग लेनिंगने आक्रमक पवित्रा कायम ठेवला होता. तिने 57 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 92 धावांची खेळी केली. पण शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. त्यामुळे वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वातही शतकी खेळी पाहता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 177 धावा केल्या आणि विजयासाठी 178 धावांचं आव्हान दिलं.
विजयासाठी दिलेलं आव्हान गाठताना गुजरात टायटन्सची चांगली कोंडी झाली. शेवटच्या दोन षटकात झटपट दोन विकेट पडल्याने दडपण वाढलं. कधी सामना या पारड्यात तर कधी त्या पारड्यात झुकत होता. त्यामुळे प्रेक्षकही मैदानात अस्वस्थ होत होते. गुजरात जायंट्सच्या हरलीन देओलने एका बाजूने खिंड लढवणं सुरुच ठेवलं होतं. त्यात कशवी गौतमने षटकार मारून डोक्यावरचं टेन्शन कमी केलं. त्यामुळे शेवटच्या 7 धावांची गरज गुजरातला होती. या धावा 3 चेंडू राखून केल्या आणि गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सवर 5 गडी राखून विजय मिळवला.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, हरलीन देओल, एशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, फोबी लिचफिल्ड, भारती फुलमाली, काशवी गौतम, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅनाबेल सदरलँड, मॅरिझाने कॅप, जेस जोनासेन, सारा ब्राइस (विकेटकीपर), निकी प्रसाद, मिन्नू मणी, शिखा पांडे, तितास साधू.