
वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकताच मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दव फॅक्टर आणि आतापर्यंतच्या चार सामन्यांचा निकाल पाहता हा निर्णय घेतला. इतकंच काय तर गुजरातची कर्णधार गार्डनर हीलाही प्रथम गोलंदाजी करायची होती. नाणेफेकीचा कौल होताच मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने सांगितलं की, ‘आपण प्रथम गोलंदाजी करू. पहिली सहा षटके प्रथम गोलंदाजी करणे खूप महत्वाचे आहे आणि आम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. आपण खूप चांगले क्रिकेट खेळलो आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत होतो आणि आज आपण दोन खेळाडू पदार्पण करत आहोत. साईका इशाकच्या जागी परुनिका खेळत आहे. कामिलिनी देखील खेळत आहे. ते खूप प्रेरित आहेत आणि त्यांच्यासोबत खेळण्यास उत्सुक आहोत.’
जी कमालिनीने अंडर 19 वर्ल्डकप 2025 स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. वर्ल्डकप जिंकवण्यात तिने मोलाची भूमिका बजावली होती. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताच तिने एका विक्रमाची नोंद केली आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत खेळणारी सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे. जी कमालिने 16 वर्षे आणि 213 दिवसांची असताना पदार्पण केलं. यापूर्वी हा विक्रम गुजरातच्या शबनम शकीलच्या नावावर होता. तिने 16 वर्षे आणि 263 दिवसांची असताना पदार्पण केलं होतं. युपी वॉरियर्सची पर्शवी चोप्री ही तिसरी तरुण खेळाडू ठरली होती. तिने 2023 मध्ये 16 वर्षे 312 दिवसांची असताना पदार्पण केलं होतं.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), हरलीन देओल, डिआंड्रा डॉटिन, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, काशवी गौतम, प्रिया मिश्रा.
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जी कमलिनी, अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया