
वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील दुसऱ्याच सामन्यात वादाला तोंड फुटलं आहे. शनिवारी 15 फेब्रुवारीला मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात सामना पार पडला. दिल्लीने सनसनाटी सामन्यात शेवटच्या बॉलवर मुंबईवर विजय मिळवला. मात्र हा सामना थर्ड अंपायरने दिलेल्या 3 रन आऊटच्या निर्णयांमुळे वादग्रस्त ठरला. थर्ड अंपायरच्या या अशा निर्णयांमुळे आता क्रिकेट विश्वातून याविरोधात नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. या सामन्यात नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबईने दिल्लीला विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीला विजयी धावांचा पाठलाग करताना 15 चेंडूत 25 धावांची गरज होती.
दिल्ली कॅपिट्ल्सकडून शिखा पांडे आणि निकी प्रसाद दोघी मैदानात होत्या. शिखाने 18 व्या ओव्हरमध्ये फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बॉल हवेत उडाला. शिखा आणि निकी दोघी दुसरी धाव घेण्यासाठी धावल्या, मात्र स्ट्राईक एन्डवर डायरेक्ट थ्रो लागला. शिखा स्ट्राईक एन्डच्या दिशेने धावत होती. शिखा नॉट आऊट असल्याचं थर्ड अंपायरने जाहीर केलं, मात्र रिप्लेत डायरेक्ट थ्रो लागला तेव्हा शिखाची बॅट रेषेबाहेर असल्याच दिसत होतं. त्यानंतरही अंपायरने नॉट आऊट जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी असंच चित्र पाहायला मिळालं. राधा यादव बॅटिंग करत होती. तेव्हा थर्ड अंपायरने दिलेल्या निर्णयाने सर्व थक्क झाले.
दिल्लीने या वादादरम्यान मुंबईवर मात करत विजयी सलामी दिली, मात्र शेवटच्या चेंडूवर रन आऊटवरुन पुन्हा वाद पाहायला मिळाला. दिल्लीची बॅट्समन दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट होता होता वाचली, मात्र हा निर्णय फार वादग्रस्त होता. दिल्लीची फलंदाज रन आऊट असल्याचं दिसतं होतं, मात्र थर्ड अंपायरने फलंदाजाला नाबाद असल्याचं जाहीर केलं. थर्ड अंपायरने नॉट आऊट दिल्याने दुसरी धाव पूर्ण झाल्याचं स्पष्ट झालं. आता या निर्णयावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद रंगला आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : मेग लेनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी आणि राधा यादव.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, सजीवन सजाना, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल आणि सायका इशाक.