
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात गुजरात जायंट्सचं पारडं जड दिसत आहे. नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर हा या स्पर्धेतील ट्रेंड असल्याचं दिसून आले आहे. दुसऱ्यांदा धावांचा पाठलाग करणं सोप असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याशिवाय पर्याय नव्हता. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले आणि दडपण वाढलं. स्मृती मंधाना आणि डॅनियल व्याट होज्ड स्वस्तात बाद झाले. एलिसा पेरीला तर खातंही खोलता आलं नाही. आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने पॉवर प्लेचं गणितच बिघडलं. त्यामुळे मोठी धावसंख्या होईल की नाही याबाबत शंका होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 7 गडी गमवून 125 धावांपर्यंत मजल मारली. तसेच गुजरात जायंट्समोर विजयासाठी 126 धावांचं आव्हान दिलं.
बंगळुरूची धावसंख्या विजयाच्या दृष्टीने खूपच कमी आहे. एकूण धावसंख्येपेक्षा कमी धावसंख्या असल्याने गुजरातला विजय मिळवण्यासाठी दार उघडले आहे. लक्ष्य जरी सामान्य असले तरी खेळपट्टी हळू गोलंदाजांना मदत करते हे देखील विसरून चालणार नाही. आरसीबीच्या गोलंदाजांनी शिस्त आणि अचूकता राखली तर गुजरातच्या फलंदाजीसाठी ही धावसंख्या देखील आव्हानात्मक ठरू शकते. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याची सुवर्णसंधी गुजरातकडे आहे. आता दोन संघापैकी कोण बाजी मारेल याची उत्सुकता आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), रघवी बिस्ट, कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, किम गर्थ, प्रेमा रावत, रेणुका सिंग ठाकूर.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, फोबी लिचफील्ड, दयालन हेमलता, ॲशले गार्डनर (कर्णधार), काशवी गौतम, डिआंड्रा डॉटिन, मेघना सिंग, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली.