
वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील (WPL 2025) तिसऱ्या हंगामातील 18 व्या सामन्यात यूपी वॉरिर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. यूपी वॉरियर्सचा हा या मोसमातील आठवा आणि शेवटचा सामना आहे. तर आरसीबीचा सातवा सामना असणार आहे. यूपीचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. त्यामुळे यूपीचा बंगळुरुविरुद्ध विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर बंगळुरुसाठी हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने निर्णायक असा आहे. त्यामुळे या सामन्यात आरसीबी विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवते की यूपी मात करत मोहिमेचा शेवट गोड करण्यात यशस्वी होते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
यूपी विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामना शनिवारी 8 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
यूपी विरुद्ध बंगळुरु सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे.
यूपी विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
यूपी विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
यूपी विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर जिओ-हॉटस्टार एपवरुन लाईव्ह पाहायला मिळेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू वूमन्स टीम : स्मृती मानधना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, राघवी बिस्ट, कनिका आहुजा, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, एकता बिष्ट, सब्भिनेनी मेघना, नुझहत परवीन, हेदर ग्रॅहम, शार्लोट डीन, जाग्रवी पवार, प्रेमा रावत आणि जोशीथा व्ही.जे.
यूपी वॉरियर्स वूमन्स टीम : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना, क्रांती गौड, पूनम खेमनार, आरुषी गोयल, अंजली सरवाणी, सायमा ठाकोर, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा आणि राजेश्वरी गायकवाड.