WIND vs WSL LIVE Streaming : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका महामुकाबल्याला किती वाजता सुरुवात होणार?

WIND vs WSL LIVE Streaming : रविवारी 11 मे रोजी ट्राय सीरिजमधील अंतिम सामन्यात वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या.

WIND vs WSL LIVE Streaming : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका महामुकाबल्याला किती वाजता सुरुवात होणार?
WIND vs WSL Final Tri Series 2025
Image Credit source: @OfficialSLC
| Updated on: May 10, 2025 | 10:07 PM

वनडे वूमन्स ट्राय सीरिज 2025 या स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने असणार आहेत. या ट्राय सीरिजमध्ये यजमान श्रीलंकेसह दक्षिण आफ्रिका आणि इंडिया 3 संघ सहभागी झाले. मात्र दक्षिण आफ्रिकेचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्ठात आलं. त्यामुळे ट्राय सीरिज ट्रॉफीसाठी यजमान श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया या 2 शेजारी देशांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सीरिजमधील महाअंतिम सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे. तर चमारी अटापटू हीच्याकडे श्रीलंकेच्या महिला संघाच्या कर्णधारपदाची धुरा आहे. उभयसंघातील अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामना केव्हा?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामना रविवारी 11 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामना कुठे?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामन्याचं भारतात प्रक्षेपण करण्यात येणार नाही.

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स श्रीलंका महाअंतिम सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.

श्रीलंका वूमन्स टीम : हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, चामरी अथापथु (कर्णधार), निलाक्षी डी सिल्वा, मनुडी नानायकका, अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), देउमी विहंगा, सुगंधिका कुमारी, मलकी मदारा, इनोशी प्रियदर्शनी, इनोका रणवीरा, हंसिमा करुणारत्ने, अचीनी कुलसूरिया, कविशा दिलहरी, रश्मिका शिववंडी आणि पियुमी बादलगे.

इंडिया वूमन्स टीम: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, श्री चरणी, स्नेह राणा, शुची उपाध्याय, काशवी गौतम, यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस आणि अरुंधती रेड्डी.