WTC 2023 Final Ind vs Aus : मोहम्मद सिराज याच्याकडून उस्मान ख्वाजाचा डब्बा गुल, पाहा व्हिडीओ काय केलं ते

| Updated on: Jun 07, 2023 | 3:46 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह टीम इंडिया मैदानात उतरली आहे.

WTC 2023 Final Ind vs Aus : मोहम्मद सिराज याच्याकडून उस्मान ख्वाजाचा डब्बा गुल, पाहा व्हिडीओ काय केलं ते
WTC 2023 Final Ind vs Aus : मोहम्मद सिराजनं पहिल्या तासातच करून दाखवलं, ख्वाजाला असा टाकला चेंडू की...
Image Credit source: ICC
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. पहिल्या डावाची सुरुवात मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या दोन गोलंदाजांनी केली. पहिल्या एका तासात चेंडू स्विम होत असल्याने फलंदाजांना सावध खेळी करणं गरजेचं होतं. यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या जोडीने सावध सुरुवात केली. विकेट महत्वाची असल्याने दोन्ही गोलंदाज लाइन आणि लेंथ पाहून गोलंदाजी करत होते. पण हाती काही लागेल असं वाटत नव्हतं. पण मोहम्मद सिराजने करून दाखवलं आणि उस्मान ख्वाजाला शून्यावर तंबूत पाठवून दिलं.

टीम इंडियासाठी चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकत असताना मोहम्मद सिराजने ख्वाजा उस्मानला बरोबर फेऱ्यात घेतला. पहिला चेंडू 141 च्या वेगाने टाकला. त्यानंतर दुसरा चेंडूत 136 च्या स्पीडने टाकला. तिसऱ्या चेंडूवर जरा वेग वाढवला आणि 139 च्या वेगाने टाकला हा चेंडू ख्वाजाने बऱ्यापैकी डिफेंड केला. त्यानंतर चौथा चेंडू 144 च्या स्पीडने टाकत थेट बाहेरचा रस्ता दाखवला.

चौथ्या चेंडूवर खेळताना बॅटचा कोपरा लागला आणि चेंडू थेट विकेटकीपर श्रीकर भरतच्या हाती गेला. ख्वाजाला आपलं खातंही खोलता आलं नाही. 10 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघ

WTC Final साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.