WTC 2023 IND Vs AUS : फायनल 2 टीम कोणत्याही असोत, WTC Final इंग्लंडमध्येच का ? भारतात का नाही ? समजून घ्या

| Updated on: May 13, 2023 | 3:05 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना 7 जून 2023 रोजी इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. यापूर्वी अंतिम सामनाही इंग्लंडच्या रोझ बॉउल मैदानात पार पडला होता.

WTC 2023 IND Vs AUS : फायनल 2 टीम कोणत्याही असोत, WTC Final इंग्लंडमध्येच का ? भारतात का नाही ? समजून घ्या
WTC 2023 IND Vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडच्या मैदानांना पसंती का? जाणून घ्या कारण
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 स्पर्धेचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणार आहे. दोन वर्ष कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करत दोन्ही संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला शेवटच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत करत आपलं स्थान अंतिम फेरीत निश्चित केलं आहे. अंतिम फेरीचा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. हा सामना 7 जून 2023 ते 11 जून 2023 दरम्यान असेल. तसेच एक दिवस राखून ठेवला आहे.अंतिम फेरीचा सामना इंग्लंडमध्ये ठेवल्याने क्रीडा रसिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना इंग्लंडमधील साउथॅम्पटॉनमधल्या रोझ बॉउल मैदानात पार पडला. या सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आले होते. तसेच हा सामना न्यूझीलंडने 8 गडी राखून जिंकला होता. त्यामुळे दुसरा अंतिम सामना इंग्लंडमध्ये ठेवल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना कुठे?

2021-2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर आहे. यापूर्वी म्हणजेच 2019-2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साउथॅम्पटॉनच्या रोझ बाउल मैदानात खेळला होता. तर 2023-2025 स्पर्धेचा अंतिम सामन्यासाठी इंग्लंडचं लॉर्ड्स मैदान निश्चित करण्यात आलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम सामने इंग्लंडमध्येच का?

इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आयोजित करण्याचा निर्णय अनेक संभाव्य घटकांवर अवलंबून आहे. पण या बाबत आयसीसीने औपचारिकपणे काहीही सांगितलेलं नाही. इंग्लंडमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळ्याला सुरुवात होते. इंग्लंडमधील मैदान कसोटीसाठी अनुकूल आहे. भारतात फिरकीला मदत करणारी, ऑस्ट्रेलियासारखी सपाट खेळपट्टी, तसेच दक्षिण ऑफ्रिकेत सीमर्सला मदत करणारी नाहीत.

इंग्लंडमध्ये जागतिक दर्जाची क्रिकेटमधील सर्वोत्तम मैदानं आहेत. यात लॉर्डस् आणि ओव्हल मैदानाचा समावेश आहे. या मैदानात खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी अनुकूल आहेत.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भारत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

भारताचे स्टँडबाय प्लेयर्स : ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.