SA vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज फेल, रबाडाने ठोकलं अर्धशतक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवून दिली. रबाडाने अर्धशतकी खेळी केली.

SA vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज फेल, रबाडाने ठोकलं अर्धशतक
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज फेल, रबाडाने ठोकलं अर्धशतक
Image Credit source: Mike Hewitt/Getty Images
| Updated on: Jun 11, 2025 | 6:21 PM

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका समोरासमोर आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बाजूने पडताच दक्षिण अफ्रिकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांनी पहिल्या सत्रात दमदार प्रदर्शन केलं. आघाडीच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. लंच ब्रेकपर्यंत अवघ्या 67 धावांवर 4 फलंदाज तंबूत परतले होते. दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने दोन गडी बाद केले आणि एक कारनामा आपल्या नावावर आहे. एका षटकात दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. यासह रबाडाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक पूर्ण केलं. रबाडाने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 विकेट पूर्ण केल्या आहेत. त्याने 11 सामन्यांच्या 19 डावात ही कामगिरी केली आहे.

दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने संघाचं सातवं षटक रबाडाकडे सोपवलं. कारण रबाडाचा सामना करणं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कठीण जात असल्याचं दिसून आलं. उस्मान ख्वाजा चेंडूंचा सामना तर करत होता पण धावा काही येत नव्हत्या. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजा चूक करून बसला आणि विकेट दिली. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. रबाडाने सहाव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये उस्मान ख्वाजाची विकेट काढली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा बाद केलं आहे. बुमराह आणि वोक्सने ख्वाजाला कसोटीत सहावेळा बाद केले आहे. ख्वाजाला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टूअर्ट ब्रॉडच्या नावावर आहे. त्याने 8 वेळी ख्वाजाला बाद केलं आहे.

फॉर्मात असलेला कॅमरून ग्रीन आला. त्याला या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तंबूत पाठवला. कॅमरून ग्रीनला 3 चेंडूत फक्त 4 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 50 विकेट घेणारा रबाडा दक्षिण अफ्रिकेचा दहावा गोलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 70 विकेट घेतल्या. त्याने 15 कसोटीत ही किमया साधली होती. तर रबाडाने 11 कसोटी सामन्यात 51 विकेट घेतल्या आहेत. यात तीन वेळा पाच विकेट घेतल्या आहे. सामना सुरु असून यात कामगिरी आणखी भर पडू शकते.