AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, तिलक वर्माला फायदा; सूर्यकुमार यादवला झटका

आयसीसीने टी20 क्रिकेटमधील नवी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत काही खेळाडूंना फायदा झाला आहे. तर काही खेळाडूंना फटका बसला आहे. टीम इंडियाचा टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर

टी20 आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ,  तिलक वर्माला फायदा; सूर्यकुमार यादवला झटका
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माImage Credit source: PTI
| Updated on: Jun 11, 2025 | 3:43 PM
Share

आयसीसीने 11 जून 2025 रोजी टी20 क्रिकेटमधील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली. क्रमवारी पाहता यात काही खेळाडूंना फायदा, तर काही खेळाडूंचा तोटा झाला आहे. टी20 क्रमवारीत जिथपर्यंत एखादी टी20 मालिका होत नाही तिथपर्यंत काही फरक पडणार नाही. भारतीय संघाने आयपीएल 2025 स्पर्धा असल्याने आंतरराष्ट्रीय टी20 मालिका खेळली नव्हती. यामुळे आयसीसी टी20 क्रमवारीत भारतीय खेळाडूंना फार काही तोटा झालेला नाही. नव्या टी20 क्रमवारीत तिलक वर्माला जबरदस्त फायदा झाला आहे. तर भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचं एका क्रमाने नुकसान झालं आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा घातक फलंदाज ट्रेव्हिस हेड पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याच्या खात्यात 856 गुण आहेत. त्याच्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अभिषेक शर्माच्या गुणांमध्ये 27 अंकांचा फरक आहे.

भारतीय संघाकडून सलामीला खेळणाऱ्या अभिषेक शर्माचे 829 गुण आहेत. तर तिलक वर्माला क्रमवारीत फायदा झाला आहे. तिलक वर्मा चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे 804 गुण आहेत. इंग्लंडच्या फिल सॉल्टने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेतून नाव मागे घेतल्याने तिलक वर्माला फायदा झाला आहे. तर फिल सॉल्ट तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचं पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. सूर्यकुमार यादवचे 739 गुण आहेत. तर त्याच्या जागी आता जोस बटलर बसला आहे. त्याच्या खात्यात 772 गुण आहे.

सातव्या स्थानावर श्रीलंकेचा पाथुम निस्सांका आहे. त्याच्या खात्यावर 714 गुण आहेत. आठव्या स्थानी न्यूझीलंडचा टिम सैफर्ट असून त्याच्या खात्यात 708 गुण आहेत. श्रीलंकेचा कुसल परेरा आणि दक्षिण अफ्रिकेचा रीझा हेन्ड्रिक संयुक्तपणे नवव्या स्थानावर आहे. दोघांच्या नावावर 676 गुण आहे. दरम्यान, टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल 11व्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 673 गुण आहेत.

टी20 संघांच्या क्रमवारीत भारतीय संघ 271 गुणांसह आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे 262 गुण आहेत. इंग्लंडचे 254, न्यूझीलंडचे 249, वेस्ट इंडिजचे 246, दक्षिण अफ्रिकेचेच 245, श्रीलंकेचे 235, पाकिस्तानेचे 229, अफगाणिस्तानचे 223 आणि बांगलादेशचे 220 गुण आहेत.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.