AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final 2023 : सिलेक्शन कमिटी मुंबई इंडियन्सच्या प्रमुख खेळाडूला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवणार का?

WTC Final 2023 : सिलेक्शन कमिटी मुंबई इंडियन्सच्या प्रमुख खेळाडूला ड्रॉप करण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याचवेळी मुंबईच्या दुसऱ्या प्लेयरला मात्र लॉटरी लागू शकते. राहुल द्रविड मे च्या शेवटच्या आठवड्यातच इंग्लंडला रवाना होतील.

WTC Final 2023 : सिलेक्शन कमिटी मुंबई इंडियन्सच्या प्रमुख खेळाडूला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवणार का?
Team india
| Updated on: Apr 24, 2023 | 1:48 PM
Share

WTC Final 2023 : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडिया गटागटाने लंडनमध्ये दाखल होणार आहे. हेड कोच राहुल द्रविड संपूर्ण कोचिंग स्टाफसह 23-24 मे दरम्यान लंडनला रवाना होतील. आयपीएल 2023 च्या प्लेऑफ शर्यतीतून बाहेर होणारे खेळाडू द्रविड यांच्यासोबत लंडनला जाऊ शकतात. अन्य खेळाडू आयपीएल संपल्यानंतर टीमला जॉइन करतील. कॅप्टन रोहित शर्मा आणि अन्य खेळाडू 1 जूनपासून इंग्लंडमध्ये पूर्णपणे सराव सुरु करतील.

“राहुल मे च्या शेवटच्या आठवड्यात 23-24 मे दरम्यान लंडनला रवाना होईल. आयपीएलमधील कमिटमेंट संपल्यानंतर अन्य प्लेयर्स इंग्लंडला जातील. आयपीएलमधील आव्हान आधीच संपुष्टात आल्यास काही खेळाडू द्रविड यांच्यासोबत रवाना होऊ शकतात” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.

श्रेयस अय्यरच्या जागी कोणाला संधी?

चेतेश्वर पुजारा अंतिम टप्प्प्याची तयारी सुरु असताना, टीमला जॉइन करु शकतो. सध्या तो इंग्लंडमध्ये ससेक्स काऊंटीकडून खेळतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी मे च्या पहिल्या आठवड्यात टीम निवडली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेसाठी निवडण्यात आलेली टीम जवळपास कायम राहिल. श्रेयस अय्यरच्या जागी कोणाला निवडायच, याचा निर्णय निवड समितीला घ्यावा लागणार आहे. सूर्यकुमार यादवकडे इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव नाहीय. निवड समिती श्रेयसच्या जागी अजिंक्य रहाणेची निवड करु शकते.

टीम इंडियाला त्याच्या निवडीचा भरपूर फायदा

मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यानंतर अजिंक्य राहणेला टीममधून वगळण्यात आलं. त्यानंतर फॉर्मसाठी अजिंक्यचा संघर्ष सुरु होता. सध्या अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 मध्ये खोऱ्याने धावा करतोय. त्याशिवाय त्याच्याकडे टेस्ट क्रिकेट खेळण्याचा दीर्घ अनुभव आहे. याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. त्याला सिलेक्शन कमिटीने काय सूचना केलीय?

सिलेक्टर्सनी अजिंक्यला लाल बॉलने सराव करण्याची सूचना केली आहे. सूर्यकुमार आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. अजूनही त्याला म्हणावा तसा सूर गवसलेला नाहीय. WTC फायनलमध्ये मुंबईच्या एका खेळाडूला वगळून दुसऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते.

Follow Us
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले; म्हणाले...
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे
सचिन तेंडुलकर यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप
राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल, UPI शुल्काबाबत गंभीर आरोप