WTC Final 2023 | Ishan Kishan की K S Bharat? टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाची एन्ट्री?

| Updated on: Jun 07, 2023 | 3:01 PM

World Test Championship Final 2023 | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्याकडून विकेटकीपर म्हणून केएस भरत आणि ईशान किशन या दोघांपैकी कुणाला संधी दिली पाहा.

WTC Final 2023 | Ishan Kishan की K S Bharat? टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाची एन्ट्री?
Follow us on

लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आजपासून 7 जून ते 11 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना खेळवण्यात येत आहे. या महाअंतिम सामन्यासाठी टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी आहे, प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून कुणाचा समावेश करण्यात  आला यआहे, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागून राहिलेली आहे.  एका विकेटकीपरच्या जागेसाठी  केएस भरत आणि इशान किशन हे 2 दावेदार आहेत.  या दोघांपैकी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगली होती. अखेर क्रिकेट चाहत्यांना त्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

कॅप्टन रोहित शर्मा याने प्लेइंग इलेव्हनमध्ये केएस भरत याचा विकेटकीपर म्हणून समावेश केला आहे. त्यामुळे अखेर केएस की इशान या चर्चेला पूर्णविराम मिळालं आहे.

ऑस्ट्रेलिया-टीम इंडियापैकी मजबूत कोण?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 106 सामन्यांपैकी 44 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 32 सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघांना 29 सामने ड्रॉ करण्यात यश आले आहे. तर 1 सामना हा टाय झालाय.

हे सुद्धा वाचा

ऑस्ट्रेलियाने या 44 पैकी 30 सामने घरच्या मैदानात जिंकले आहेत. तर 14 सामने ऑस्ट्रेलियाबाहेर जिंकले आहेत. तर भारताने 23 देशात आणि 9 परदेशात सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.