Australia vs India Highlights WTC Final 2023 Day 1 | ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, पहिल्या दिवसाचा खेळ संपला

| Updated on: Jun 07, 2023 | 10:49 PM

Australia vs India Live Score in Marathi Today WTC Final Match | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आज 7 जूनपासून आयसीसी टेस्ट वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

Australia vs India Highlights WTC Final 2023 Day 1 | ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, पहिल्या दिवसाचा खेळ संपला

लंडन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या महामुकाबल्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.  ऑस्ट्रेलियाने  85 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात 327 धावा केल्या आहेत.  या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाची हुकुमत राहिली.  ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात 2 आणि दुसऱ्या सत्रात 1 विकेट गमावली.  मात्र त्यानंतर तिसऱ्या सत्रात टीम इंडियाला एकही विकेट घेता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड  सर्वाधिक नाबाद 146 धावा करुन मैदानात आहे. तर स्टीव्हन स्मिथ 94 रन्सवर नॉट आऊट आहे. तर उस्मान ख्वाजा याने 0, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेने याने  26 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.  दरम्यान आता टीम इंडियाच्या गोलंदाजांकडून दुसऱ्या दिवशी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 07 Jun 2023 10:44 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा, टीम इंडिया विरुद्ध 3 बाद 327 धावा

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 3 विकेट गमावून 85 ओव्हरमध्ये 327 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड  सर्वाधिक नाबाद 146 धावा करुन मैदानात आहे. तर स्टीव्हन स्मिथ 94 रन्सवर नॉट आऊट आहे. तर उस्मान ख्वाजा याने 0, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेने याने  26 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

    पहिल्या दिवसाचा खेळ संपला

     ऑस्ट्रेलियाच्या सत्रनिहाय धावा

    पहिलं सत्र | 23 ओव्हर 73 धावा आणि 2 विकेट्स

    दुसरं सत्र | 28 ओव्हर 97 धावा आणि 1 विकेट

    तिसरं सत्र | 34 ओव्हर 157 धावा आणि 0 विकेट

  • 07 Jun 2023 10:08 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियाच्या 300 धावा पूर्ण, टीम इंडिया अडचणीत

    ऑस्ट्रेलियाने 300 धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन आणखी वाढलंय. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 100 धावा या 176 बॉलमध्ये पूर्ण केल्या. त्यानंतर 100 ते 200 धावांचा टप्पा टप्पा पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 177 चेंडूंचा सामना केला. तर 200 ते 300 या 100 धावा ऑस्ट्रेलियाने अवघ्या 129 चेंडूमध्ये पूर्ण केल्या.

  • 07 Jun 2023 09:45 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियाची चौथ्या विकेट्ससाठी द्विशतकी भागीदारी

    ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीने चौथ्या विकेट्ससाठी 200 धावांची भागीदारी केली आहे. या भागीदारी दरम्यान ट्रेव्हिसने आपलं शतक आणि स्टीव्हने अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 07 Jun 2023 09:07 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ट्रेव्हिस हेड याचं शानदार अर्धशतक

    ट्रेव्हिस हेड याने टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात शतक ठोकलंय. ट्रेव्हिस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये  शतक करणारा पहिला ऑस्ट्रेलियन ठरला आहे.

  • 07 Jun 2023 08:05 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | टी ब्रेकनंतर तिसऱ्या सत्राला सुरुवात

    टी ब्रेकनंतर पहिल्या दिवसातील तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने 51 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या होत्या.  कांगारुंनी दुसऱ्या सत्रातील 28 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 97 धावा केल्या. ट्रेव्हिस हेड 60 आणि स्टीव्हन स्मिथ 33 धावांवर नाबाद आहेत. हेड आणि स्मिथ या जोडीने चौथ्या विकेटसाठी 164 बॉलमध्ये 94 धावांची नाबाद भागीदारी केली.

    त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया चांगल्या स्थितीत पोहचली आहे. तर टीम इंडियाला विकेटची गरज आहे. यामुळे आता टीम इंडियाला कोण ब्रेक थ्रू मिळवून देणार,याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 07 Jun 2023 07:48 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | दुसऱ्या सत्राचा ‘गेम ओव्हर’

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने 51 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 170 धावा केल्या आहेत.  कांगारुंनी दुसऱ्या सत्रातील 28 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 97 धावा केल्या आहेत. ट्रेव्हिस हेड 60 आणि स्टीव्हन स्मिथ 33 धावांवर नाबाद आहेत. हेड आणि स्मिथ या जोडीने चौथ्या विकेटसाठी 164 बॉलमध्ये 94 धावांची नाबाद भागीदारी केली आहे.

    ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या सत्रातील धावा :  97/1,  28 ओव्हर.

    ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या सत्रातील धावा : 73/2, 23 ओव्हर.

  • 07 Jun 2023 07:19 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ट्रेव्हिस हेड याचं अर्धशतक

    ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेड याने अर्धशतक पूर्ण केलंय. ट्रेव्हिसचं हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 14 वं अर्धशतक ठरलंय.

  • 07 Jun 2023 06:54 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियाची चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या जोडीने मार्नस लाबुशेन आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सावरलाय. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.

  • 07 Jun 2023 05:49 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका

    मोहम्मद शमी याने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला आहे. शमीने मार्नस लाबुशेन याला क्लिन बोल्ड केलं आहे. लाबुशेनने 26 धावांची खेळी केली. मार्नस आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची  3 बाद  76 अशी स्थिती झाली आहे.

    शमीला स्पेलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट

  • 07 Jun 2023 05:44 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु

    लंच ब्रेकनंतर पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. स्टीव्हन स्मिथ आणि मार्नस लाबुशेन मैदानात खेळत आहेत.

  • 07 Jun 2023 05:22 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | पहिल्या सत्राचा खेळ संपला

    पहिल्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात 2 विकेट्स गमावून 23 ओव्हरमध्ये 73 धावा केल्या.  मार्नस लाबुशेन 26 आणि स्टीव्हन स्मिथ 2 धावांवर नाबाद खेळत आहेत.  तर उस्मान ख्वाजा (0) आणि डेव्हिड वॉर्नर (43) धावा करुन आऊट झाले.  मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर या दोघाांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

    लंचब्रेकनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर किती?

  • 07 Jun 2023 04:58 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | केएस भरत याचा सुपर कॅच, शार्दुलची कमाल बॉलिंग, डेव्हिड वॉर्नर आऊट

    शार्दुल ठाकूर याने टीम इंडियाला दुसरी आणि मोठी विकेट मिळवून दिली आहे.  शार्दुलने धोकादायक ठरत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला विकेटकीपर केएस भरत याच्या हाती कॅच आऊट केलं.  केएसने शानदार कॅच घेतला. वॉर्नरने 60 बॉलमध्ये 43 धावांची खेळी केली.

    केएस भरत याचा सुंदर कॅच

  • 07 Jun 2023 04:22 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | 15 व्या ओव्हरमध्ये 4 चौके

    डेव्हिड वॉर्नर याने 15 व्या ओव्हरमध्ये उमेश यादव याच्या बॉलिंगवर 4 चौकार ठोकले आहेत. यासह ऑस्ट्रेलियाने 50 धावाही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया विकेटच्या शोधात आहे.

  • 07 Jun 2023 04:05 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | पहिल्या तासाचा ‘गेम ओव्हर’

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्या तासाचा खेळ यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. सामन्यातील पहिला तास हा टीम इंडियाच्या नावावर राहिला. टीम इंडियाने या पहिल्या तासात ऑस्ट्रेलियाला एक झटका दिला. ऑस्ट्रेलियाने  12 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 29 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन मैदानात खेळत आहेत.

  • 07 Jun 2023 03:19 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | मोहम्मद सिराजकडून ऑस्ट्रेलियाला पहिला झटका

    मोहम्मद सिराज याने ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिल आहे. सिराजने उस्मान ख्वाजा याला कॅच आऊट केलं आहे. उस्मानला भोपळाही फोडता आला नाही.

  • 07 Jun 2023 03:08 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात, सलामी जोडी मैदानात

    ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

  • 07 Jun 2023 03:03 PM (IST)

    विठूरायाच्या द्वारी; आरोग्याची वारी!

    28 आणि 29 जुन असे दोन दिवस चालणार महाआरोग्य शिबीर .

    29 जूनला आहे आषाढी यात्रेचा सोहळा.

    20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट

    आरोग्याची वारी , पंढरीच्या दारी संकल्पनेवर आरोग्य विभागाचे शिबिर.

    वाखरी, गोपाळपूर ,सोलापूर रोड अशा तीन ठिकाणी भरणार महाआरोग्य शिबीर

    आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली माहिती

  • 07 Jun 2023 02:52 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | अशी आहे ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

    ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

    ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या खेळाडूंचा समावेश

  • 07 Jun 2023 02:50 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन

    टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

    अशी आहे टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

  • 07 Jun 2023 02:36 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 1 | टीम इंडियाने टॉस जिंकला

    टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया पहिले बॅटिंग करणार आहे.

    टीम इंडियाची टॉस विजयाने सुरुवात

  • 07 Jun 2023 01:31 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 1 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वरचढ कोण?

    टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 106 सामन्यांपैकी 44 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 32 सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघांना 29 सामने ड्रॉ करण्यात यश आले आहे. तर 1 सामना हा टाय झालाय.

    ऑस्ट्रेलियाने या 44 पैकी 30 सामने घरच्या मैदानात जिंकले आहेत. तर 14 सामने ऑस्ट्रेलियाबाहेर जिंकले आहेत. तर भारताने 23 देशात आणि 9 परदेशात सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ आहे.

  • 07 Jun 2023 01:29 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 Day 1 | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया महामुकाबला

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम 2 संघांमध्ये आयसीसी टेस्ट वर्ल्ड कपसाठी आजपासून लढत होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल इथे करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाची धुरा ही रोहित शर्मा याच्याकडे आहे. तर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया टीमचं नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे.

    कोण जिंकणार टेस्ट वर्ल्ड कप?

Published On - Jun 07,2023 1:20 PM

Follow us
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.