WTC Final : दुष्काळात तेरावा, फायनलच्या मैदानावर जे ठरतात हिरो तेच खेळाडू… टीमसाठी वाईट बातमी!

| Updated on: Jun 05, 2023 | 8:04 PM

WTC Final 2023 : विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदा फायनल गाठली होती. मात्र न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपवर नाव कोरलं होतं. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कडवं आव्हान आहे.

WTC Final : दुष्काळात तेरावा, फायनलच्या मैदानावर जे ठरतात हिरो तेच खेळाडू... टीमसाठी वाईट बातमी!
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. आशिया कपमध्येही पराभवाचं तोंड पाहावं. त्यामुळे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियासाठी विजय अपरिहार्य आहे.
Follow us on

मुंबई :  WTC 2023 च्या फायनलला अवघे 48 तास बाकी आहेत. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर हा फायनल सामना पार पडणार आहे. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदा फायनल गाठली होती. मात्र न्यूझीलंडने भारताचा पराभव करत पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपवर नाव कोरलं होतं. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कडवं आव्हान आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरज्या दोन खेळाडूंची कामगिरी दमदार आहे मात्र दुर्देवाने ते दोन खेळाडू यंदाच्या फायनलमध्ये ते खेळताना दिसणार नाहीत.

कोण आहेत ते दोन खेळाडू?

स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय खेळाडूंना कठीण जातं. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या नावावर इंग्लंडमध्ये मोठा विक्रम आहे. इंग्लंडमध्ये गेल्या 10 डावांमध्ये राहुलने 501 धावा केल्या आहेत. 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आला तेव्हा राहुलने खूप धावा केलेल्या. दुखापतीमुळे आधीच WTC फायनलमधून बाहेर पडला आहे. आयपीएल 2023 दरम्यान राहुलला हाताला दुखापत झाली होती.

या सामन्यात राहुलसोबतच संघाला ऋषभ पंत कमी भासणार आहे.  भासणार आहे. राहुलनंतर कर्णधार रोहितने गेल्या 10 डावात सर्वाधिक धावा केल्या आहेत. रोहितने 432 धावा केल्या नंतर यादीतील तिसरं नाव पंतचं आहे. पंतने इंग्लंडमध्ये खेळलेल्या शेवटच्या 10 डावांमध्ये 390 धावा केल्या होत्या, त्याच्या 5 कसोटी शतकांपैकी त्याने 2 शतकं इंग्लंडमध्ये केली आहेत. रोड अपघातामध्ये पंत जखमी झाला होता तेव्हापासून त्याने क्रिकेटच्या मैदानात पाऊल टाकेललं नाही.

WTC फायनलसाठी टीम इंडियाचा संघ:

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (W), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उंदकट .