WTC Final 2023 : लागला तर तुक्का, नाहीतर… रोहित फायनलमध्ये खेळू शकतो खतरनाक चाल

WTC Final 2023 : रोहित त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी देण्याचा धोका नक्कीच पत्करेल. कारण आता दुसरा ऑप्शन पण नाहीय. चालला, तर रोहित शर्मासाठी हा खेळाडू घातक अस्त्र ठरु शकतो.

WTC Final 2023 : लागला तर तुक्का, नाहीतर... रोहित फायनलमध्ये खेळू शकतो खतरनाक चाल
जर टीम इंडिया आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्यात यशस्वी ठरली, तर क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणताही संघ करू शकणार नाही असा दुर्मिळ विक्रम लिहिला जाईल. जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशिप जिंकली तर ते वनडे, टी-20 आणि कसोटी अशा तीन फॉरमॅटमध्ये विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरेल. (Photo: ICC Twitter)
| Updated on: Jun 05, 2023 | 12:26 PM

लंडन : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या द केनिंग्टन ओव्हल मैदानात ही फाय़नल रंगणार आहे. फायनलमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा एक खतरनाक चाल खेळू शकतो. WTC फायनलमध्ये रोहित शर्मा एका धोकादायक फलंदाजाला संधी देऊ शकतो. जो 6 व्या नंबरवर बॅटिंगला येऊन धुवाधार बॅटिंग करु शकतो. चालला, तर रोहित शर्मासाठी हा खेळाडू घातक अस्त्र ठरु शकतो.

WTC च्या फायनलमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून कोणाला संधी द्यायची? यावर टीम इंडियाची मॅनेजमेंट दुविधेमध्ये आहे. टीम इंडियाकडे केएस भरत आणि इशान किशन हे दोन ऑप्शन आहेत.

धमाकेदार बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनची गरज

फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाला इशान किशनची आवश्यकता आहे. कारण केएस भरत किपिंग आणि बॅटिंग दोन्ही आघाड्यावर फ्लॉप ठरलाय. टीम इंडियाला एका स्फोटक फलंदाजाची गरज आहे. जो इंग्लंडमध्ये धमाकेदार बॅटिंग करु शकतो.

स्फोटक इनिंगमध्ये 24 फोर आणि 10 सिक्स

ऋषभ पंत अपघातामुळे टीममध्ये नाहीय. अशावेळी टीम इंडिया ऋषभ पंत सारख्या स्फोटक फलंदाजाची जागा भरुन काढण्यासाठी इशान किशनला संधी देऊ शकते. इशान किशनने मागच्यावर्षी बांग्लादेश विरुद्ध डबल सेंच्युरी झळकवली होती. त्याने 131 चेंडूत 210 धावा फटकावल्या होत्या. त्याने आपल्या स्फोट इनिंगमध्ये 24 फोर आणि 10 सिक्स मारले होते.

तो म्हणजे एक्स-फॅक्टर

ऋषभ पंत नसल्याने टीम इंडियाला मिडिल ऑर्डरमध्ये एक्स-फॅक्टरची कमतरता जाणवेल. इशान किशन ही जागा भरुन काढू शकतो. इशान किशनने काही इनिंग्समध्ये त्याची क्षमता दाखवून दिलीय. पण त्याच्या कामगिरीत सातत्य नाहीय. केएस भरतच्या तुलनेत इशान किशन जास्त भरवशाचा वाटतो. त्यामुळे त्याला संधी मिळू शकते.

इशान किशन टीम इंडियाकडून 14 वनडे सामना खेळलाय. त्याने 42.50 च्या सरासरीने 510 धावा केल्या आहेत. यात एक सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरी आहेत.