AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC WTC Final 2023 नंतर भारताचा एक मोठा स्टार प्लेयर करु शकतो रिटायरमेंटची घोषणा

ICC WTC Final 2023 च्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळणं कठीण दिसतय. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने फायनल नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.

ICC WTC Final 2023 नंतर भारताचा एक मोठा स्टार प्लेयर करु शकतो रिटायरमेंटची घोषणा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट. राखीव: सूर्यकुमार यादव, यशवी जैस्वाल आणि मुकेश कुमार
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 9:23 AM

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. येत्या 7 जूनपासून लंडनच्या केनिंगटन ओव्हल मैदानावर फायनलचा सामना सुरु होईल. टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्याची ही दुसरीवेळ आहे. टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. दोन्ही टीम्स फायनलसाठी इंग्लंडमध्ये कसून सराव करतायत. ही फायनल झाल्यानंतर एका दिग्गज खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करु शकतो.

भारतीय टीम सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी कठोर मेहनत घेत आहे. टीमला आपल्या बाजूने कुठलीही कसर ठेवायची नाहीय. ओपनर रोहित शर्माकडे टीम इंडियाच नेतृत्व आहे. फायनल नंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो.

टीम इंडियाचा कुठला खेळाडू करेल निवृत्तीची घोषणा?

टीम इंडियाचा सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन WTC फायनलनंतर निवृत्ती जाहीर करु शकतो. चेन्नईमध्ये राहणारा अश्विन येत्या सप्टेंबरमध्ये 37 वर्षांचा होणार आहे. वाढत वय आणि कामगिरीतील घसरण यामुळे तो निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो.

प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी

अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या शेवटच्या टप्प्यावर आहे. मागच्या काही काळात त्याला टेस्ट व्यतिरिक्त अन्य फॉर्मेटमध्ये फार संधी मिळालेली नाही. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल संपल्यानंतर तो निवृत्ती जाहीर करु शकतो, असा अंदाज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अश्विनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे, असं ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक कोच डेनियल विटोरी यांनी म्हटलं आहे. टेस्टमध्ये त्याच्या नावावर 5 सेंच्युरी

अश्विन आतापर्यंतच्या आपल्या टेस्ट करीयरमध्ये 92 कसोटी सामने खेळलाय. त्याने 474 विकेट घेतले आहेत. 7 वेळा 10 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. वनडेमध्ये 151 आणि T20 इंटरनॅशनलमध्ये 72 विकेट घेतलेत. अश्विनने टेस्ट करीयरमध्ये 5 सेंच्युरी आणि 13 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.