Video : युवराज सिंगचा 6 बॉलवर 6 सिक्सचा धमाका, स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये इतिहास रचला, 14 वर्षांपूर्वी काय घडलं?

| Updated on: Sep 19, 2021 | 12:45 PM

2007 चा टी -20 चा पहिल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात स्पर्धेत दाखल झाली होती. सुरुवातीला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारलेल्या टीम इंडियाकडून कुणाला फारशा अशा नव्हत्या.

Video : युवराज सिंगचा 6 बॉलवर 6 सिक्सचा धमाका, स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये इतिहास रचला, 14 वर्षांपूर्वी काय घडलं?
युवराज सिंग
Follow us on

मुंबई: 2007 चा टी -20 चा पहिल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात स्पर्धेत दाखल झाली होती. सुरुवातीला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारलेल्या टीम इंडियाकडून कुणाला फारशा अशा नव्हत्या. मात्र, टीम इंडियानं 2007 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहास रचला तो आपल्या सर्वांना माहिती आहे. टी-20 वर्ल्डकपमधील एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे टीम इंडियाच्या ऑल राऊंडर युवराज सिंग यानं स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये घडवलेला इतिहास होय. युवराज सिंगनं स्टुअर्ट ब्रॉडच्या त्या ओव्हरमध्ये सहा बॉलवर सलग सहा षटकार खेचले आणि विक्रम प्रस्थापित केला.

रॉबिन उत्थापा आऊट झाल्यानंतर युवराज मैदानात

इंग्लंड विरोधात टीम इंडिया अगोदर बॅटिंग करत होती. रॉबिन उत्थापा आऊट झाल्यानंतर युवराज सिंग मैदानात आला. युवराज सिंगनं मैदानात आला आणि त्यानं 12 चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं. युवराज सिंगनं स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये 6 षटकार खेचले. टीम इंडियानं या मॅचमध्ये 218 धावा केल्या.

युवराज सिंगचा ‘त्या’ ओव्हरमध्ये धमाका

18 वी ओव्हर संपताना युवराज सिंग आणि अँण्ड्रू फ्लिंटॉफ यांच्या थोडासा तणाव निर्माण झाला होता. याचा राग एक प्रकारे युवराज सिंगन पुढच्या ओव्हरमध्ये काढला. महेंद्रसिंग धोनी यावेळी नॉन स्ट्राईकर एंडला होता. 19 वी ओव्हर स्टुअर्ट ब्रॉडकडे होती. स्टुअर्ट ब्रॉडसाठी ती ओव्हर आयुष्यात कधीही विसरणार नाही अशी ठरली. युवराज सिंगनं त्या ओव्हरमध्ये एका पाठोपाठ एक असे 6 षटकार लगावले. युवराज सिंगच्या त्या खेळाच्या जोरावर टीम इंडियानं 218 धावा केल्या. टीम इंडियानं ही मॅच 18 धावांनी जिकंली.

पुढे टीम इंडियानं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला. अखेरच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला. युवराज सिंगला मॅन ऑफ द सीरिझ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2019 मध्ये युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवराज सिंगनं 304 एकदिवसीय सामने, 58 टी-20 सामने आणि 40 कसोटी सामने खेळले आहेत.

आजपासून आयपीएल सुरु

कोरोनाच्या संकटामुळे मधूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2021) 14 वे पर्व पुन्हा सुरु होणार आहे. उर्वरीत 31 सामने युएईत 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. आयपीएलमधील पाच वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळवला जाईल. तर स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना 10 ऑक्टोबरला तर एलिमिनेटर 11 ऑक्टोबरला खेळवला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला खेळवला जाईल.

पहिल्या पर्वात दिल्‍ली कॅपिटल्‍स आणि पंजाब किंग्‍सने 8-8 सामने खेळले असून इतर संघानी 7-7 सामने खेळले आहेत. यामध्ये दिल्‍ली कॅपिटल्‍सचा (Delhi Capitals) संघ सर्वात यशस्वी असून त्यांनी 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यानंतर चेन्‍नई सुपरकिंग्‍सला (Chennai Superkings) महेंद्र सिंह धोनीने 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत.

इतर बातम्या:

T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

Yuvraj Singh 6 sixes in Stuart Broad’s over in T20 World Cup on this day