माझ्यासारखी चूक करू नका…! युवराज सिंगने शुबमन गिल आणि अभिषेक शर्माला दिला सल्ला

आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया आता युएईत दाखल झाली आहे. या स्पर्धेत जेतेपदासाठी भारतीय मजबूत दावेदार मानला जात आहे. असं असताना भारताची माजी स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगने शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांना खास सल्ला दिला आहे. काय म्हणाला ते जाणून घ्या...

माझ्यासारखी चूक करू नका...! युवराज सिंगने शुबमन गिल आणि अभिषेक शर्माला दिला सल्ला
माझ्यासारखी चूक करू नका...! युवराज सिंगने शुबमन गिल आणि अभिषेक शर्माला दिला सल्ला
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 05, 2025 | 5:19 PM

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी युवराज सिंगचे शिष्य असलेले शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या दोघांना संघात स्थान मिळालं आहे. शुबमन गिल प्रदीर्घ कालावधीनंतर टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल हे दोन्ही खेळाडू युवराज सिंगच्या छत्रछायेखाली शिकले आहेत. त्यामुळे युवराज सिंग या दोन्ही खेळाडूंना अधिकारवाणीने सल्ले देत असतो. अनेकदा सोशल मीडियावर खरडपट्टीदेखील काढतो. असं असताना आशिया कप स्पर्धेपूर्वी युवराज सिंगने या दोन्ही खेळाडूंना सल्ला दिला आहे. युवराज सिंगने एका कार्यक्रमात सांगितलं की, शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या दोघांनी मी केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये. गोल्फ खेळावं. कारण यामुळे त्यांना अधिक धावा करण्यास मदत होणार आहे.

युवराज सिंगने सांगितलं की, मी त्यांना गोल्फ खेळण्यास प्रोत्साहित करतो. वेळ काढणं खूप कठीण आहे. पण मला वाटते की आयपीएल त्यांच्यासाठी वेळ काढण्याची आणि काही चेंडू खेळण्याची एक चांगली संधी आहे. ते त्यांच्यावर अवलंबून आहे. सध्या ते सुपरस्टार ठआहेत. पण त्यांना चांगलं करण्यास काय मदत करेल हे ठरवायचं आहे. जर गोल्फ काही असू शकतं. तर त्यांना त्यासाठी निश्चित करावं लागेल. पण मी सर्व खेळाडूंना गोल्प खेळण्यासाठी प्रोत्साहित करतो. मला वाटतं की तणाव दूर करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तसेच डोक्यासाठीही चांगलं आहे. युवराज म्हणाला की, जर त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत गोल्फ खेळला असता तर त्याने 3000 अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या असत्या.

युवराज सिंग म्हणाला की, “मला वाटते की तुम्हाला आराम करण्यास मदत करणारा कोणताही खेळ शरीरावर कमी भार देणारा आणि मनासाठी अधिक फलदायी असेल. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंडमधील गोल्फची संस्कृती पाहिली तर बहुतेक सर्वोत्तम क्रिकेटपटू खूप लहानपणापासूनच गोल्फ खेळले आहेत.” पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा भारताकडून सलामीला येणार आहेत.भारताचा पहिला सामना युएईशी 10 सप्टेंबरला, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी 14 सप्टेंबरला दोन हात करणार आहे.